युगांडाच्या संसदेत भाषण देणारे नरेंद्र मोदी भारताचे पहिले पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
 
युगांडा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युगांडाच्या संसदेत भाषण दिले असून हे करणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर नरेंद्र मोदी गेले असून काल रवांडा या देशासोबत भारताने आठ करार केले तसेच आज त्यांचा युगांडा देशाचा देखील दौरा संपला आहे आता ते आता दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. 
 
 
 
 
१० व्या ब्रिक्स संमेलनात भाग घेण्यासाठी ते या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. युगांडा या देशाचा दौरा हा भारतासाठी फलदायी ठरला असून आम्ही हवी तेवढी मदत देण्याचा प्रयत्न करू असे नरेंद्र मोदी या संसदेत म्हणाले. आफ्रिकेचा मित्र राष्ट्र बनण्याचा भारताला गर्व असून संसाधन आणि नैसर्गिक संपत्तीचा योग्य वापर हेच आमच्या भेटीचे उद्दिष्ट आहे असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
 
 
 
यावेळी नरेंद्र मोदी यांनी व्यापार संघटनेला देखील संबोधित केले. उद्योगाचा पायाभूत विकास करणे तसेच पायाभूत सुविधा मजबूत करणे हाच आपला मूळ उद्देश असणे गरजेचे आहे. भारत आणि युगांडा यांच्या व्यापारी असंतुलन असल्याने हे दूर करणे गरजेचे आहे. त्यामुळे चर्चा आणि त्याची अंमलबजावणी करूनच आपण पुढे जावू शकतो असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@