रवांडा आणि भारतामध्ये आठ करारांवर स्वाक्षऱ्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2018
Total Views |
 
 
 
रवांडा : पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपासून तीन आफ्रिकी देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झालेत. या दौऱ्यात नरेंद्र मोदी यांनी प्रथम रवांडा देशाची भेट घेतली. या भेटीदरम्यान नरेंद्र मोदी आणि रवांडाचे राष्ट्रपती पॉल कैगैमे यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. या चर्चेदरम्यान या दोन्ही राष्ट्रांमध्ये आठ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. नरेंद्र मोदी आणि पॉल कैगैमे यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले आहे. 
 
 
२०० मिलियन डॉलरच्या क्रेडीट लाईनसाठी यावेळी करार करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांनी रवांडाला प्रत्येक क्षेत्रात जेवढी मदत देता येईल तेवढी भारत रवांडा मदत करेल असे आश्वासन दिले. दोन्ही देशांमध्ये अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आल्या. दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून रवांडा देखील या चर्चेत उत्फुल्ल सहभाग घेत होता अशी माहिती देण्यात आली आहे. 
 
 
रवांडामध्ये लवकरच भारतीय उच्चायोग देखील उघडण्यात येणार आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि सांस्कृतिक क्षेत्राला उत्तेजन देण्यासाठी कृषी आणि पशुपालन या क्षेत्रामध्ये करार करण्यात आले. तसेच सुरक्षा क्षेत्रांत तंत्रज्ञान आणि क्षमता विकास या विषयांमध्ये देखील करार करण्यात आले. यासोबतच कातडी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन्ही देशांनी होकार दर्शविला. यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये गती येणार अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. 
 
@@AUTHORINFO_V1@@