पुस्तकांच्या गावात भरणार पहिल्यांदाच बाल साहित्य संमेलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2018
Total Views |




भिलार : देशातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिलार येथे पहिल्यांदाच बाल साहित्य संमेलन भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेकडून हा निर्णय घेण्यात आला असून यासाठी लवकरच सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची भेट घेण्यात येणार असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

साहित्य संस्थेच्या आज झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये संस्थेकडून बाल साहित्य संमेलन भरवण्यात येणार आहे. यासाठी म्हणून स्थळ निश्चित करण्याविषयी झालेल्या चर्चेमध्ये भिलारच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आली. तसेच याविषयी तावडे यांना भेटून भिलारमध्ये संमेलन भरवण्याविषयी परवानगी घेण्यासंबंधी देखील चर्चा करण्यात आली. त्यामुळे लवकरच याविषयी तावडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@