नगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2018
Total Views |





जामखेड : नगर-सोलापूर महामार्गावर आज दुपारी एक स्कॉर्पियो गाडी आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. नगर-सोलापूर महामार्गावरील जामखेड येथे ही घटना घडली असून सुदैवाने एक लहान मुलगा या अपघातातून बचावला आहे. दरम्यान हा मुलगा गंभीररित्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी म्हणून जामखेडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


आज दुपारी एमएच १२ एचझेड २९५३ ही स्कॉर्पियो गाडी नगरहून सोलापूरच्या दिशेने जात होती. यावेळी जामखेड जवळ अचानक वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे गाडी थेट समोरून येणाऱ्या एका मोठ्या मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. अपघातावेळी दोन्ही गाड्या अत्यंत वेगाने येत असल्यामुळे स्कॉर्पियो गाडीतील पाच नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान हे सर्वजण नगरमधील नेवासा तालुक्यातील रहिवाशी असल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. नेवास्यातील खरवंडी यागावातील हे सर्वजण असून आपल्या खासगी कामासाठी म्हणून हे सर्व जण सोलापूरकडे जात होते. परंतु दुर्दैवाने वाटेमध्ये काळाने त्यांच्यावर घाला घातला.
@@AUTHORINFO_V1@@