जि.प.च्या समाजकल्याण विभागातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम
जळगाव :
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्ताने ‘सामाजिक न्याय दिवस’ नुकताच साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने शुक्रवारी २० रोजी जिल्ह्यातील दिव्यांग मुलांनी कांताई सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विविध कलाविष्कार सादर करुन उपस्थित जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्यासह विविध अधिकार्यांचे मने जिंकली.
शहरातील कांताई सभागृहात गुरुवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी प्रमुख जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी संजय मस्कर, समाजकल्याण अधिकारी डॉ.अनिता राठोड यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील समाजकल्याण अंतर्गत येणार्या विविध कर्णबधीर, मुकबधीर, अंध, मतीमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या छुप्या कलागुणांचे सादरीकरण करुन उपस्थित मान्यवरांसह शिक्षक, पालकांनी या मुलांचे कौतुक केले.
जिल्ह्यातील या १४ विद्यालयांचा सहभाग
अंधशाळा चाळीसगाव (समुहगीत), उत्कर्ष मतीमंद विद्यालय (कोळीगीत) , पांडे मतीमंद विद्यालय पाचोरा (देशभक्तीपर गीत), प्रेरणा मतीमंद विद्यालय चोपडा (स्वच्छता नाटीका), मुकबधीर विद्यालय जळगाव (पथनाट्य प्लास्टीक बंदी), श्रवण विकास मंदीर जळगाव (चंदा चमके), मुकबधीर विद्यालय पिंपळगाव हरेश्वर (मोरया मोरया), वनश्री डी.डी.चव्हाण मुकबधीर विद्यालय चाळीसगाव (माऊली माऊली), ममता मतीमंद विद्यालय अमळनेर (बम बम बोले), मुकबधीर विद्यालय चोपडा (विठ्ठल नामाची शाळा भरली), श्रवण विकास मंदिर जळगाव (आकाची पोतळी), मुकबधीर विद्यालय देवगाव (सारे जहा से अच्छा), मुकबधीर विद्यालय धरणगाव (स्वयं से करेंगे सबका स्वागत), वनश्री डी.डी.चव्हाण चाळीसगाव (मोबाईलचे दुष्परिणाम) या विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.