योगा- योगाने गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड!- सतत तीन वेळा विश्वकीर्तिमान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2018
Total Views |

 
 
- सतत तीन वेळा विश्वकीर्तिमान
 
मंगरुळनाथ, 
 
डॉ. सुधाकर क्षीरसागर
 
एखादी गोष्ट सहज जुळून आली तर त्याला ‘योगायोगाने झाले’, असे म्हणतात. मात्र एका योगवेड्याने अत्यंत परिश्रमाने सतत तीन वेळा जागतिक स्तरावर विक्रम केला. आता त्याला खर्‍या अर्थाने ‘योगा’-‘योगा’ने म्हणायचे नाही तर काय?
 
मोहन ठाकरे... मंगरुळनाथ शहरालगतच्या शहापूर राहतात. गुजरात येथील अहमदाबाद येथे पहिल्यांदा आंतराष्ट्रीय योग दिना निमित्त 21 जून 2017 रोजी तीन तास तेहतीस मिनिटे तेहतीस सेकंद शीर्षासन केले. वाशीम येथे 1 फेब्रुवारी 2018 रोजी दोन तास बावीस मिनटे बावीस सेकंद वृक्षासन व राजस्थान येथील कोटा येथे आंतराष्ट्रीय योग दिना निमित्त 21 जून 2018 रोजी वृश्चिकासन दोन तास दोन मिनिटे केले... गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सतत तीन वेळा प्रथमस्थान मिळविले.
हे तीनही विक्रम योग गुरु रामदेव बाबा यांच्या समक्ष नोंदविल्या गेले आहेत.
 
 
‘शीर्षासन’ हे एकाग्रता वाढविते. संपूर्ण शरीराला ताण मिळत असल्याने शरीर लवचिक होतं. ‘वृक्षासन’ या आसनामुळे शरीराच्या प्रत्येक भागाला पुरेसा व्यायाम मिळतो. ‘वृश्चिकासना’मुळे हाताचे, दंडाचे आणि तळव्यांचे स्नायू बळकट होतात.
 
मोहन ठाकरे हा बीकॉम च्या अंतीम वर्षाला असून, वडील शंकर ठाकरे हे व्यवसायिक व पतंजली किसान सेवा समितीचे जिल्हा प्रभारी आहेत. तर आई गृहीणी असून, दोघेही ग्रामीण भागात प्रत्यक्ष जावून नि:शुल्क योग शिबिरे व लोकांच्या आजारावर मार्गदर्शन करतात. योगक्रीया व आसने आजारानुसार करून घेतात. मोहन ठाकरे याने सतत तीन वेळा गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे नोंदविला. या उपक्रमात महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री राम व्यवहारे, युवा भारत सहराज्य प्रभारी शंकर नागापुरे, महाराष्ट्रराज्य सदस्य रामदास धनवे तथा वाशीम जिल्हा समितीनेचे सहकार्य लाभत आहे.
@@AUTHORINFO_V1@@