मोदी सरकारकडे दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत
अविश्वास प्रस्ताव फोल ठरणार असल्याचा दावा
नवी दिल्ली : केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावानंतर नवी दिल्लीतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. या दरम्यान केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी विरोधकांवर विशेषतः कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला असून अविश्वास ठरवा म्हणजे सोनिया गांधी यांचे गणित कच्चे असल्याचे लक्षण आहे, अशी टीका अनंत कुमार यांनी केली आहे. मोदी सरकारकडे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत असून विरोधकांचा अविश्वास ठराव फोल ठरणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसरी ते संसदेबाहेर पत्रकारांशी बोलत होते. 'लोकशाहीमध्ये विरोधकांना प्रश्न करण्याचा आणि गरज पडल्यास सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्ष हे या प्रस्तावाचा चुकीचा उपयोग करू पाहत आहेत. या अविश्वास ठरावाच्या अडून ते एक वेगळी राजकीय खेळी खेळू पाहत आहेत. जे अत्यंत चुकीचे आहे. परंतु हे लोक विसरत आहेत कि, संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये रालोआकडे बहुमत आहे. त्यामुळे केंद्र सरकारला यापासून कसलाही धोका नाही. उलट विरोधकांचा हा डाव त्यांच्यावरच उलटेल, असा विश्वास कुमार यांनी व्यक्त केला आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कालच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मोदी सरकारविरोधात लोकसभेत अविश्वास ठराव दाखल केला. सर्व विरोधकांच्या पाठिंब्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी देखील हा प्रस्ताव मान्य करत, यावर उद्या चर्चा करण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे नवी दिल्लीत सध्या सर्व विरोध मोदी सरकारविरोधात एकजूट होण्याची तयार करत आहेत. त्यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण सध्या चांगलेच ढवळून निघत आहे.