दूध दरवाढीवरून विरोधक आक्रमक ; सभागृहाचे कामकाज तहकूब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2018
Total Views |




नागपूर : दूध दरवाढीवरून राज्यात सुरु असलेल्या आंदोलनचे पडसाद आता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील उमटू लागले असून दूध दरवाढीच्या प्रश्नावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधकांनी दूध दरवाढीच्या मुद्यावरून सभागृहात चांगलाच गोंधळ घातला असून यामुळे सभागृहाचे कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.


आज सकाळी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी दूध दरवाढीवरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यानंतर सभागृहात देखील विरोधकांनी हाच मुद्दा उचलून धरत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना विरोधकांनी घेरत शेतकऱ्यांना दूध दरवाढ देण्याची मागणी केली. यावर जानकर यांनी येत्या दोन-तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रण देऊ, असे म्हटले. परंतु शेतकऱ्यांचा प्रश्न हा अत्यंत जटील असून यावर तत्काळ तोडगा काढण्याची मागणी केली. यावर जानकर यांनी कसल्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे विरोधकांनी सभागृहामध्ये गदारोळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले आहे.

शिवसेनाचा देखील आंदोलनाला पाठिंबा

कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेनंतर आता सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेनी दूध दरवाढ आंदोलनाला आपला पाठींबा दिला आहे. सेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी या आंदोलनाला पक्ष पाठिंबा असल्याचे सभागृहात जाहीर केले असून राज्याबाहेरून येणाऱ्या दूधावर सरकारने कर वाढवावा, अशी मागणी गोऱ्हे यांनी केली आहे. जेणे करून बाहेरील राज्यातून येणाऱ्या दुधावर चाप बसेल..

@@AUTHORINFO_V1@@