तिरुपती बालाजीचे मंदिर ६ दिवस राहणार बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2018
Total Views |

विशिष्ट पूजेसाठी म्हणून मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय

१२ वर्षातून एकदाच होते पूजा





तिरुमाला : देशातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुमाला येथील व्यंकटेश्वर बालजीचे मंदिर येथे ऑगस्ट महिन्यात सहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय तिरुपति देवास्थानम् बोर्डने (टीटीडी) घेतला आहे. मंदिरामध्ये बारा वर्षातून एकदा होणाऱ्या एका विशिष्ट पूजेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून देवस्थान बोर्डच्या आज झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

बोर्डचे अध्यक्ष पुट्टा सुधाकर यादव यांनी आज याविषयी माहिती दिली आहे. तिरुपती बालाजी मंदिरामध्ये दर बारा वर्षांमध्ये एकदा महासंप्रोक्षण अनुष्ठान केले जाते. यामध्ये मंदिरात होम-पूजा आणि मंदिराची साफसफाई आणि इतर डागडुजी केली जाते. त्यासाठी म्हणून एकूण सहा दिवस मंदिर बंद ठेवले जाते. त्यामुळे या वर्षी ऑगस्ट महिन्यात ११ ते १७ तारखेपर्यंत मंदीर बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये हे सहा दिवस मंदिरामध्ये भाविका तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येणार नाही.


दरम्यान या विषयी मंदिराने आणखी काही महिती देत, ११ ऑगस्टला संध्याकाळी ६ वाजता मंदिर बंद केले जाईल, असे सांगितले आहे. तसेच त्यानंतर मंदिर हे १७ तारखेला सकाळी ६ वाजता भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी या सहकार्य करावे, असे आवाहन देखील बोर्डकडून करण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@