कोल्हापूरमध्ये एसटी बसला भीषण अपघात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018
Total Views |



कोल्हापूर : कोल्हापुरातील गगनबावडा तालुक्यामध्ये एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका ६२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला असून १५ प्रवाशी यामध्ये जखमी झाले आहेत. दरम्यान जखमी नागरिकांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गगनबावडा तालुक्यातील लोंघे येथे आज सकाळी साडे नऊच्या सुमारास हा अपघात झाला आहे. लोंघेहून गगनबावडाकडे जाताना दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. यामध्ये बस चालकांसह दोघे जण गंभीर जखमी झाले. तर एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, जखमी नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान वाहनचालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे रस्ते निसरडे झाल्यामुळे घाटमार्गाने येताना वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे एक बस समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसला जाऊन धडकल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@