भारत सरकारच्या या निर्णयामुळे भारतीय पर्यटनाला चालना मिळणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
नवी दिल्ली : भारत सरकारच्या एका महत्वाच्या निर्णयामुळे आता भारतीय पर्यटनाला चालना मिळणार आहे. विदेशी आणि भारतीय पर्यटकांना आता स्मारकांचे छायाचित्र काढता येणार आहे असा निर्णय भारतीय सरकारने नुकताच जाहीर केला आहे. यामुळे भारतीय पर्यटनाला चांगलीच चालना मिळणार आहे. भारतात अनेक स्मारक आहेत मात्र या स्मारकांचे छायाचित्र काढण्यात सक्त मनाई असल्याने इतके दिवस पर्यटक केवळ स्मारक दृश्य स्वरुपात पाहू शकत होते. 
 
 
 
या स्मारकांच्या आठवणी पर्यटक आपल्या कॅमेऱ्यात कैद करू शकत नव्हते. त्यामुळे इतरांना देखील हे स्मारक दाखवणे अवघड होते. मात्र आता जग तंत्रज्ञान जोपासत आहे. एक छायाचित्र पर्यटनाला चालना देवू शकते असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले असल्याने भारत सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता भारतीय स्मारकांचे छायाचित्र पर्यटक काढू शकणार आहेत. 
 
 
 
या निर्णयामुळे देशातील आणि विदेशातील पर्यटक आनंदी होतील अशी अपेक्षा नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण उपग्रहाच्या माध्यमातून संपूर्ण जग फिरू शकतो. मग स्मारकांचे छायाचित्र काढू नये ही बाब फारच जुन्या विचारांची आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळणार नाही असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले असता लगेच सरकारने देखील हा निर्णय मान्य करत स्मारकांवरील फलक काढून टाकण्याचा निर्णय घेतला. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@