डॉ. आंबेडकरांचे स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018
Total Views |


 

नागपूर: चैत्यभूमी, दादर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकासाठी इंदू मिलच्या साडेबारा एकर जमिनीचे १०० टक्के हस्तांतरण झाले. या स्मारकाचे काम वेगाने सुरू असून, हे स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत लक्षवेधी सदस्य प्रकाश गजभिये यांनी मांडली. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांचे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. दि. २५ एप्रिलला साडेबारा एकर जमिनीचे हस्तांतरण होऊन त्यावर शासनाच्या नावाची नोंद झाली आहे. यातील पाच एकरातील भाग हा सीआरझेड अंतर्गत येतो, मात्र, या परिसरात हे बांधकाम येत नाही. पण यासाठी केंद्र शासनाची परवानगी घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. स्मारकाचे बांधकाम करण्यासाठी आर्थिक अडचण येणार नाही. तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पात या स्मारकासाठी १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच गरज पडल्या आणखीन निधी उपलब्ध करून देण्यात येईल, ”असेही ते म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@