बदलीनंतर रुजू न होणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2018
Total Views |
 
 
चंद्रपूर : चंद्रपूर येथील ५२ झोपडपट्ट्यांना तातडीने पट्टे वाटप करण्याचे निर्देशही देण्यात आले. चिमूरमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय देण्याबाबतची कारवाई सुरू असून लवकरच या ठिकाणी अधिकारी देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. खासदार अशोक नेते यांनी उपस्थित केलेल्या नागभीड येथील शंभर खाटांच्या रुग्णालयाबाबत लवकर निर्णय घेण्याचे सुचविण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात येत नसल्याबद्दल पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठांकडे नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच विभागीय तलाठी प्रशिक्षण केंद्रातील रिक्त पदे लवकर भरण्यात यावी, असे स्पष्ट केले. काही ठिकाणी दोन वर्षापेक्षा अधिक वेळ होऊनही अधिकारी रुजू झाले नाहीत. त्यांच्याबाबत गंभीर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
बदली झाल्यानंतर रुजू न होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत अधिक गंभीरतेने व तातडीने कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी विदर्भातील जिल्ह्यांमध्ये महत्त्वाच्या जागांवर अधिकारी रुजू होत नसेल तर त्या प्रकरणासंदर्भात तातडीने तपासणी करून अन्य अधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी व रुजू न होणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये चंद्रपूर जिल्ह्याची आघाडी
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात आघाडी घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. तथापि, दुर्गम भागातील अपूर्ण राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले. आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी घुग्गुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रस्तावाला मान्यता देण्याची मागणी केली. बैठकीच्या सुरुवातीला डॉ. शामाप्रसाद मुखर्जी वनधन योजनेच्या माध्यमातून विविध उपक्रम, योजना व जनप्रबोधन करण्यात आल्यामुळे वन्यजीव व मानव यातील संघर्ष कमी झाल्याचा लघुपट सादर करण्यात आला.
 
@@AUTHORINFO_V1@@