वर्षभरापासून फरार आरोपीस अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2018
Total Views |
 
जळगाव, १२ जुलै :
चोपडा तालुक्यातील अडावद येथील पोलीस स्टेशनात एका दाखल गुन्ह्यातील आरोपी कैलास गोविंदा कोळी रा. हातेड हा गेल्या वर्षभरापासून फरार झालेला होता. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला नुकतीच अटक केली आहे.
 
 
स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल कुराडे यांना खबर मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया देशमुख, स.पो.नि.मुरलीधर आमोदकर, नुरूद्दीन शेख, पोहेका नारायण पाटील, पोना महेंद्र पाटील, बापू पाटील, योगेश पाटील, पोकॉ मनोज दुसाने, सुशील पाटील, सचीन महाजन, प्रवीण हिवराळे, वैशाली महाजन, वहिदा तडवी यांचे पथक तयार करून हातेड बु.गावाबाहेर सापळा रचला व फरार आरोपी कैलास कोळी यास अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी अडावद पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@