गडचिरोली येथे भीषण अपघात, दोन बाळांसह ७ नागरिक मृत्युमुखी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2018
Total Views |

 
 
गडचिरोली : गडचिरोली येथे बलेनो आणि टॅक्सी यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये २ लहान बाळांसह ७ लोकांचा मृत्यु झाला आहे. ७ जणांपैकी ४ लोकांचा जागीच मृत्यु झाला. याघटनेमुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
जिमलगट्टापासून ३ किलोमीटर अंतरावर गोविंदगावाजवळ आज सकाळी ९.३० वाजता बलेनो आणि टॅक्सी यांच्यात मोठी धडक झाली. या अपघातात बलेनो गाडीतील ४ लोकांचा जागीच मृत्यु झाला. या अपघातात दोन लहान बाळांचा देखील मृत्यु झाला.
 
वाढत्या अपघातांमुळे अनेक परिवार दगावले आहेत, त्यामुळे अपघातांविषयी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आज संपूर्ण देशात एकाच दिवसात ४ मोठे अपघात झाले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@