सावखेडा बु.॥ ता. जळगाव
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक तर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये विवेकानंद प्रतिष्ठान संचालित श्रवण विकास मंदिर या सावखेडा, जळगाव येथील कर्णबधीर विद्यालयातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे .सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे येथील दिव्यांग कर्णबधीर एकूण चौदा विद्यार्थी यंदा एस.एस.सी.परीक्षेला प्रविष्ठ झाले होते.विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक पद्माकर इंगळे व सर्व शिक्षक वृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .
संस्थेतर्फे विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई पाटील, सचिव राजेंद्र नन्नवरे, कोषाध्यक्ष हेमाताई अमळकर, शालेय समिती प्रमुख पूनमताई मानूधने, मुख्याध्यापक पद्माकर इंगळे, वाहन विभाग प्रमुख मिलिंद पुराणिक व सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी वृंद यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. पुढील सुयशा करिता शुभेच्छा दिल्या आहेत.
यशाचे मानकरी, प्रथम पाच विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
(१) श्रृती शरद महाजन-८८.६०टक्के (२) विद्या विजयकुमार शेटे-८७, (३) तेजस्विनी अशोक घुले -८६.६०,(४) पूजा अशोक चौधरी -८६.४०,(५) विशाल संजीव टेकावडे -८६.२०टक्के.