दहावी : शानभागचे नेत्रदीपक यश

    09-Jun-2018
Total Views |

६० विद्यार्थ्यांना ९० टक्क्याच्यावर गुण
विशाखा कुलकर्णी ९९.२० गुण मिळवून प्रथम

 
जळगाव, ८ जून :
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्चमध्ये घेतलेल्या शालांत परीक्षेच्या निकालात विवेकानंद प्रतिष्ठान संचालित श्रीमती कै.ब.गो.शानभाग माध्यमिक विद्यालयाने भव्य यशाची निकालाची परंपरा यावर्षीही कायम ठेवली. यशस्वी विद्यार्थ्यांपैकी विद्यालयातून प्रथम पाच विद्यार्थी असे आहेत.
 
 
प्रथम - विशाखा सुरेश कुलकर्णी (९९.२०), द्वितीय - डिम्पल गणेश बोरसे(९७ ), तृतीय - युक्ता अजय बियाणी(९६.४०), नीरज शरद झोपे आणि गिरीश सतीश इंगळे(९६ ), सानिका भगवान पाटील (९५.४०), गौरव मुकेश पाटील (९५.४०) निवासी विभागातून प्रथम तेजस मगन परदेशी (९३.२०)
 
 
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभाताई पाटील, सचिव राजेंद्र नन्नवरे, शालेय समिती प्रमुख पुनमताई मानुधने, कोषाध्यक्षा हेमाताई अमळकर, निवासी शालेय समिती प्रमुख नंदकुमार जंगले आणि विवेकानंद प्रतिष्ठानचे सर्व व्यवस्थापन मंडळ सदस्य त्याचप्रमाणे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजली महाजन, उपमुख्याध्यापक जयंतराव टेंभरे, निवासी विभाग प्रमुख शशिकांत पाटील आणि शालेय परीवारामार्फत करण्यात आले.