ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार चांद्रयान-२ चे प्रक्षेपण - जितेंद्र सिंघ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2018
Total Views |
 
 

 
 
 
नवी दिल्ली : येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये चांद्रयान-२ चे प्रक्षेपण केले जाईल अशी माहिती आज केंद्रीय उत्तर-पूर्व विभाग विकास मंत्री जितेंद्र सिंघ यांनी दिली आहे. जीएसएलवी-३ कार्यक्रमाला पुढे यशस्वी करण्यासाठी ४३३८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे लवकरच चांद्रयान-२ प्रक्षेपित केले जाईल अशी माहिती जितेंद्र सिंघ यांनी यावेळी दिली. 
 
 
 
 
 
हे चांद्रयान-२ श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र येथून प्रक्षेपित केले जाईल. Geosynchronous Satellite Launch Vehicle अर्थात ‘जीएसएलवी’ च्या माध्यमातून प्रक्षेपित केले जाईल. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे हे दुसरे यान आकाशात झेप घेणार आहे जे चंद्राचे संशोधन करणार आहे. यासाठी रशियाने भारताला मदत केली असून गेल्या कित्येक वर्षांपासून या यानाचा अभ्यास करण्यात येत आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@