
आ.संजय सावकारेयांचा यशस्वी पाठपुरावा
‘उमवि’च्या बीएस्सी संगणकशास्त्र अभ्यासक्रम अनुदानीत
जळगाव, ५ जून
पुणे विद्यापीठापासून उत्तर महाराष्ट् विद्यापीठ वेगळे झाल्यानंतर ‘ उमवि ’मध्ये सुरु झालेल्या बीएस्सी संगणक पदवी अभ्यासक्रमास आजवर अनुदान नव्हते. अनुदान मिळण्याबाबत सतत मागणी होत होती. आ.संजय सावकारे यांनी ६ वर्षे त्यासाठी पाठपुरावा केला.त्याला आता आले असून अखेर या अभ्यास क्रमालाही अनुदान मंजूर झाले आहे.
पुणे विद्यापीठात बीसीएस हा संगणकशास्त्राशी सबंधीत पदवी अभ्यासक्रम होता. पण ‘ उमवि ’ सुरु झाल्यानंतर बीसीएस अभ्यासक्रम शिकविण्यासाठी त्या अभ्यासक्रमाचा प्राध्यापक तसेच तांत्रिक अडचणी असल्याने हा अभ्यासक्रम विद्यापीठाने बंद केला. परंतु विज्ञानाचे सर्व विषय आणि संगणकाचा केवळ एकच विषय असलेला बीएसस्सी कॉम्प्युटर हा अभ्यासक्रम ‘ उमविने ’ सुरु केला. बीसीएस आणि बीएसस्सी या अभ्यासक्रमांबाबत ताळमेळ होत नव्हता . बीएसस्सी कॉम्प्युटरशास्त्र अभ्यासक्रमास अनुदान नव्हते. यालाही अनुदान मिळावे म्हणून आ. संजय सावकारे सहा वर्षांपासून पाठपुरावा करीत होते. दरम्यान, पुणे विद्यापीठातूनसुध्दा यासाठी सकारात्मक पुढाकार झाला.
अखेर उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे यांनी या अभ्यासक्रमाबाबत सर्व तांत्रिक बाबी समजून घेत अनुदान देण्यासाठीच्या विषयावर स्वाक्षरी केली.
उत्तर महाराष्ट्र विद्यपीठाअंतर्गत जळगाव आणि धुळे जिल्यातील नामांकित महाविद्यालये येतात त्यात ,नूतन मराठा महाविद्यालय, मु.जे.महाविद्यालय, भुसावळ येथील नाहटा महाविद्यालय, धुळे येथील जयहिंद तसेच घोगरे महाविद्यालय यामधील संगणकशास्त्र हा विषय विनाअनुदानित होता. या विषयाच्या अनुदानावर ना. तावडे यांनी सही केल्याचा सुखद समाचार समस्त संगणक शास्त्र विषयाच्या प्राध्यापकांना आनंद देणारा आहे.
१९८७ पासून या अभ्यासक्रमास अनुदान मिळावे म्हणून पाठपुरावा होत होता.बीएसस्सी संगणकशास्त्र हा अभ्यासक्रम अनुदानित झाल्याने कमी शुल्कात हे शिक्षण घेता येईल. तसेच प्राध्यपकांच्या सेवा शाश्वतीच्या दृष्टीने चांगले झाले - दिलीप रामु पाटील,राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य उमवि.
- ६ वर्षांपासून पाठपुरावा केला. या अभ्यासक्रम शाखेचा नाहाटा महाविद्यालयाचा पहिला विद्यार्थी मी स्वत: होतो. त्यामुळे याबाबत सहानुभुती होतीच.ना. तावडे यांनी हा प्रलंबित विषय मार्गी लावल्याने प्राध्यापकांना जीवदान मिळाले आहे. - आ. संजय सावकारे,