विरोधकांची मोट कशी बांधली जाणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2018   
Total Views |



पोटनिवडणुकांमधील यशामुळे विरोधक हुरळून गेले असले, तरी देशाच्या बहुतांश भागांत आपली पाळेमुळे रोवलेल्या भाजपला पराभूत करणे सोपे नाही, हेही विरोधकांनी लक्षात घ्यायला हवे. मुख्य म्हणजे विरोधकांना सर्वप्रथम आपली तोंडे एकाच दिशेने ठेवायला हवीत. तसेच मागील वेळी कोणी कसा दगा दिला, कोणी तोंडघशी पाडले असल्या चर्चेला पूर्णविराम द्यायला हवा, पण तसे होईल का?

पुढील वर्षी होणार्‍या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीस आता एका वर्षापेक्षा कमी कालावधी राहिला आहे. या निवडणुका आणि काही राज्यांत होणार्‍या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन, भाजप विरोधकांनी आधीच जुळवाजुळव करण्यास प्रारंभ केला आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या दहा राज्यांमधील लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये मिळालेल्या यशामुळे विरोधक अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत. विरोधक एकत्र आले की भाजपसमोर ते आव्हान उभे करू शकतात, हे विरोधकांनी आताच्या कैराना लोकसभा मतदारसंघात दाखवून दिले आहे. तसेच ते भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशातील गोरखपूर व फुलपूर मतदारसंघांमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमधून दिसून आले आहे.

जेथे विरोधक विजयी झाले तेथील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत विरोधकांनी ओरड केल्याचे दिसून आले नाही. मात्र, जेथे पराभव झाला तेथे मतदान यंत्रांमध्ये गडबड असल्याचे आरोप करण्यात आले. पराभव झाला की त्याचे खापर मतदानयंत्रांवर फोडायचे हे आता नित्याचेच झाले आहे. मतदानयंत्रांमध्ये कसलीही गडबड करता येणे शक्य नसल्याचे निवडणूक आयोगाने ठामपणे सांगूनही आयोगाबद्दल संशय निर्माण करण्याचे विरोधकांनी थांबविलेले नाही. त्यातून घड्याळाचे काटे उलटे फिरवून, पुन्हा मतदानपत्रिका वापरल्या जाव्यात, अशी मागणी काही विरोधी नेत्यांनी केली आहे. पण, ती पुन्हा देशाला विसाव्या शतकाकडे नेणारी आहे, हे विरोधक लक्षात कसे घेत नाहीत?

पोटनिवडणुकांमधील यशामुळे विरोधक हुरळून गेले असले, तरी देशाच्या बहुतांश भागांत आपली पाळेमुळे रोवलेल्या भाजपला पराभूत करणे सोपे नाही, हेही विरोधकांनी लक्षात घ्यायला हवे. मुख्य म्हणजे विरोधकांना सर्वप्रथम आपली तोंडे एकाच दिशेने ठेवायला हवीत. तसेच मागील वेळी कोणी कसा दगा दिला, कोणी तोंडघशी पाडले असल्या चर्चेला पूर्णविराम द्यायला हवा, पण तसे होईल का? विरोधी पक्षांतील प्रत्येक नेत्यास, आपणच पंतप्रधान होण्यास योग्य व्यक्ती असल्याचे वाटत आहे. तसे वाटत राहिल्यास विरोधकांचे ऐक्य होणार कसे? आणि ते भाजपला पराभूत करणार कसे? विरोधकांचे ऐक्य सहजासहजी होणे कठीण असल्याचे संकेत आताच मिळू लागले आहेत.

दोन दिवसांपूर्वी, राजधानी दिल्लीत सत्तेवर असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने लोकसभेच्या निवडणुका काँग्रेस आणिआपने लढविल्यास भाजपचा पराभव करणे सहज शक्य आहे, असे सांगून तसा प्रस्ताव पुढे केला होता. दिल्लीमधील सात लोकसभा मतदारसंघांबाबत समाज माध्यमांतून आपने चर्चा छेडली होती. अलीकडील पोटनिवडणुकांमध्ये भाजपला जो पराभवाचा फटका बसला, तो लक्षात घेऊन, अशी समीकरणे मांडण्यास विरोधकांनी सुरुवात केली आहे. खरे म्हणजे काँग्रेस आणि आम आदमी पक्षहे एकमेकांचे कट्टर शत्रू, पण दोघांचा समान शत्रू असलेल्या भाजपला पराभूत करण्यासाठी ते एकत्र येऊ इच्छितात. मात्र, ‘आपचा एकत्र येण्याचा विचार काँग्रेसने धुडकावून लावल्यातच जमा आहे. दिल्लीच्या जनतेने केजरीवाल सरकारला सातत्याने नाकारले असताना आम्ही त्यांच्या मदतीला कशाला जायचे, असा प्रश्न दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीमधील लोकसभेच्या जागांबाबत विविध पातळ्यांवर चर्चा चालू असल्याचा दावाआपने केला असला, तरी अजय माकन यांचे त्यावरील भाष्य अधिक बोलके आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी एके काळीआपचा उल्लेखपावसाळ्यातील छत्र्याअसा केला होता, पण त्याचआपने दिल्लीमधील काँग्रेसची पंधरा वर्षांची राजवट उलथवून टाकली होती. समझोत्यासाठी हात पुढे करताना काँग्रेस हा सर्व इतिहास विसरून जाईल? केजरीवाल, टीम अण्णा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामुळे २०१४ च्या निवडणुकांपूर्वी भाजपला बळ मिळाले असल्याचे म्हणणारे अजय माकन केजरीवाल यांना जवळ करतील? दिल्लीमधील लोकसभेच्या सात जागांवरून विरोधकांमधील मतभेद आत्ताच चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी किती कसरत करावी लागेल याची कल्पना करा.

बसप नेत्या मायावती यांना पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा जो पराभव झाला त्याबद्दल आनंद झाला. त्याबद्दल त्यांनी जनतेचे आभारही मानले, पण असे करताना समाजवादी पक्ष वा राष्ट्रीय लोक दल यांचा उल्लेख करणे त्यांनी टाळले. विविध विरोधकांमध्ये दिलजमाईहोणे किती कठीण आहे, हे यावरून लक्षात येते. कैराना लोकसभा आणि नुरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतमहायुतीचा जो विजय झाला, त्याबद्दल मायावती यांनी मौन बाळगणे पसंत केले. मात्र, मायावती यांच्या बसपने लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन, आपले घोडे पुढे दामटविण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशात आम्हाला ८० पैकी ४० जागा हव्या, अशी मागणी बसपने केली आहे, तर लखनौ येथील एका सभेत बोलताना, बसपलासन्मानजनकन वागविल्यास, आपला पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवेल,” असे मायावती यांनी घोषित केले. सपलाही उत्तर प्रदेशातील अनेक जागा लढवायच्या आहेत. या दोन पक्षांनी जास्त जागांवर दावा केला, तर राष्ट्रीय लोकदल, काँग्रेस यांनी कोणाच्या तोंडाकडे पाहायचे? कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकारच्या शपथविधी समारंभप्रसंगी विरोधी पक्षांच्या ऐक्याचे दर्शन घडले असले, तरी हे कसे कठीण आहे, त्याची झलक पाहण्यास मिळू लागली आहे.

विविध राज्यांपुरते मर्यादित असलेले पक्षही मोर्चेबांधणी करू लागले आहेत. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वृत्तपत्रांमधून दिलेल्या जाहिराती वाचकांच्या पाहण्यात आल्या आहेतच. आपल्या सरकारने अवघ्या चार वर्षांमध्येसुवर्ण तेलंगणकसे बनविले, याचा डांगोरा त्यांनी पिटला आहे. भावी काळात अशा अनेक जाहिराती पाहायला मिळतील. सत्तेवर असलेले प्रादेशिक पक्ष आपण काय काय केले हे दाखविण्याचा प्रयत्न करणार हे उघड आहे. प्रादेशिक पक्षांच्या तुलनेतराष्ट्रीय पक्षम्हणविणार्‍या काँग्रेसची अवस्था बिकट आहे. फक्त कर्नाटक, पंजाब, पाँडिचेरी या राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेसला आपले घोडे पुढे दामटविता येणार नाही, हे उघड आहे. विविध राज्यांत काँग्रेसपेक्षा प्रबळ असलेले पक्ष काँग्रेस म्हणेल तसे ऐकण्यास तयार होतील? राहुल गांधी यांनी पंतप्रधान होण्याची आपली इच्छा आधीच बोलून दाखविली आहे. अन्य विरोधी पक्षांना ते मान्य आहे? त्याबद्दल बाकीचे गप्प आहेत. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन, पावले टाकणार्‍या विरोधकांना सगळ्यांना एकत्रित बांधून ठेवणे जमेल असे वाटत नाही. आपापले अहंकार बाजूला ठेवून, केवळ भाजपला हरविण्यासाठी ही मंडळी एकत्र येतील, असे वाटत नाही. ममता बॅनर्जी, मायावती, चंद्राबाबू नायडू, शरद पवार, राहुल गांधी अशा विविध नेत्यांच्या उड्या मोठमोठ्या आहेत. त्यांना तडजोडी करणे शक्य होईल?

विरोधकांच्या या हालचाली चालू असतानाच दुसरीकडे, भाजपनेसंपर्क फॉर समर्थनही मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी नुकतीच दिल्लीत क्रिकेटपटू कपिल देव यांची भेट घेतली. माजी लष्कर प्रमुख जनरल (निवृत्त) दलबीर सिंह सुहाग, माजी लोकसभा महासचिव सुभाष कश्यप यांनाही ते भेटले. अन्य अनेक प्रभावी मंडळींना ते भेटणार आहेत. तसेच भाजपचे चारशे नेते सुमारे एक लाखांहून अधिक अशा समाजातील प्रभावी व्यक्तींची भेट घेणार आहेत. भाजपचीही मोर्चेबांधणी चालू आहे, तर दुसरीकडे, भाजपविरोधात सर्व विरोधक एकत्र येऊ पाहत आहेत. कोणाची वाटचाल कशी होत आहे ते पुढील काळात दिसून येईल!

@@AUTHORINFO_V1@@