शासकीय योजनांची अंमलबजावणी सामाजिक दायित्वाचे भान ठेवून करावी : चौधरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2018
Total Views |

 
 
 
गडचिरोली : राजर्षी छत्रपती शाहू महाराजानी त्यांच्या राज्यात समाजाच्या सर्वांगीण विकासाठी केलेल्या कामाची जाणीव ठेवूनच केंद्र शासन तथा राज्य शासन विविध योजना राबवित आहे. दिन-दुबळया, आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या वंचित लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या योजनांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा मात्र सामाजिक दायीत्वाचे भान ठेवून काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी आज येथे केले. छत्रपती शाहू महाराज यांची १४४ वी जयंती सामाजिक न्याय दिन म्हणुन राज्यभर साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधुन डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवनात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते.
 
 
कार्यक्रमाचे अध्यक्ष नगर परिषदेच्या अध्यक्षा योगिता पिपरे तर प्रमुख पाहुणे विद्यापीठ सिनेट सदस्य प्रकाश गेडाम, प्रमोद पिपरे, राजेश पांडे, समाज कल्याण अधिकारी पेंदाम,सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे, जात पडताळणी संशोधन अधिकारी पुष्पलता आत्राम, नगर परिषदेचे बालकल्याण सभापती रंजना गेडाम, नगरसेविका वर्षा वट्टे हे मंचकावर उपस्थित होते.
 
 
पुढे बोलताना अपर जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले की, मानवाचा स्वभाव आहे की आपली चूक आपल्याला दिसत नाही, उलटपक्षी दुसऱ्याची छोटीशी चुक सुध्दा मोठया स्वरुपात आपणास दिसते. तेव्हा शासकीय कामकाज करीत असताना सकारात्मक विचार करुन झालेल्या गोष्टींचे परिमार्जन करीत न बसता चुकामध्ये दुरुस्ती करुन कामे करावीत. आपण आपल्यावर सोपविलेले काम मनापासून केल्यास त्याचे समाधानही लाभेल आणि लाभार्थ्याला त्याचा लाभ व्यवस्थित मिळेल. 
 
 
याप्रसंगी प्रकाश गेडाम बोलताना म्हणाले की, देशातील प्रत्येक नागरिकांना समान अधिकार, सोई सुविधा निर्माण करुन देण्याचे, तसेच दीन-दुबळे, गरीब व वंचित लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम स्वातंत्र्यपुर्व काळात छत्रपती शाहू महाराजांनी केले. छत्रपती शाहू महाराज हे आपले प्रेरणास्रोत आहेत.
 
 
शाहू महाराजांनी स्वातंत्र्यपुर्व काळात दलीत उपेक्षित समाजातील जनेतेला आरक्षण सुरु केले. विद्यमान शासन लोककल्याणकारी योजना राबवित आहे. जिल्हयाच्या विकासाकरिता सर्व जनतेनी एकत्र ऐवून कार्य करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगितले. आपला देश सर्व जाती धर्मानी बनलेला आहे. या करिता समाजातील विषमता दूर करुन समाज एकसंघ व्हावा व एकत्रितपणे चालावा ही शाहू महाराजांची भूमिका होती. त्यासाठी तळागाळातील माणसांना समान संधी दिली पाहिजे असे जाती पडताळणी उपआयुक्त राजेश पांडे यांनी याप्रसंगी केलेल्या भाषणात सांगितले.
 
 
यावेळी जाती संशेाधक पुष्पलता आत्राम म्हणाल्या की, प्रतिकूल परिस्थितीतही समाजामधील विषमता दूर करण्याचे काम शाहू महाराजांनी केले असून आता जातीय विषमता दूर करण्यासाठी समाजामध्ये बंधुत्वाची भावना निर्माण केली पाहिजे. त्यासाठी शाहू महारांजाची प्रेरणा समाजातील प्रत्येक घटकांनी आत्मसात केली पाहिजे. लोकशाहीत शासन व प्रशासनातील यंत्रणा समन्वय ठेवून, सामाजिक दायित्वाचे भान ठेवून काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
यावेळी नगर परिषद अध्यक्षा योगिता पिपरे आपल्या भाषणात म्हणाल्या की, शाहू महाराजांनी बहूजन समाज, उपेक्षित व वंचित समाजासाठी मोठे कार्य केले आहे. त्यांचे कार्य समाजांनी विसरु नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक नावाचे साप्ताहीक सुरु केले होते. काही कालावधीनंतर ते बंद पडले असता शाहू महाराजांनी आर्थिक मदत केल्यामूळे पुर्ववत साप्ताहिक सुरु झाले. तसेच उपेक्षित व वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणले. त्यांच्या या कार्यामुळे समाजातील उपेक्षित लोकांना मोठया शिक्षणाची संधी मिळून मोठया पदावर जाण्याची संधी मिळाली आहे. आज काही कार्यक्रमाच्या प्रसंगी स्त्रियांना गौण दर्जा देत असल्याचे निदर्शनास येते ते योग्य नाही असे यावेळी मत व्यक्त. 
 
 
 
सामाजिक न्याय दिना निमित्त सामाजिक न्याय विभागातील निवासी शाळेतील व वसतीगृहातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच मुख्याद्यापक निवासी शाळा व गृहपाल यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये विजयमाला आकुदारी, स्वरुपा दुर्गे, मोनिका कारसपल्ली, गोवर्धन दुर्गम, उत्कर्ष मुंजामकर, अनिकेत दुर्गे, सचिन विलास सातपुते, श्रेणुशा कौशिक नागरे, मुख्याद्यापिका के.एम. हजारे, मुख्याध्यापक आर. पी. डुले, गृहपाल व्हि. पी. सोनटक्के, गृहपाल. अ. ज्ञा. जाधव यांचा रोख, शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@