शाहू महाराजांचे कार्य आजही अनुकरणीय : कुकडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2018
Total Views |

सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा 
समता रॅलीचे आयोजन

 
 
 
 
भंडारा : राज्यर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दलित, मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी सदैव कार्य केले. आरक्षणाची गरज त्याकाळात ओळखून त्यांनी आपल्या राज्यात आरक्षण लागू केले. महाराजांनी केवळ समाजसुधारकच नाही तर अन्य क्षेत्रात भरीव कार्य केले असून शाहू महाराजांचे कार्य आजही अनुकरणीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जडण घडणीत राजर्षी शाहू महाराजांचे मोलाचे योगदान आहे. त्यांचे विचार आजच्या पिढीने अंगिकारणे आवश्यक असून समाजात रुजविणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन खासदार मधुकर कुकडे यांनी केले. 
 
 
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भंडारा व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस २६ जनू हा सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन भंडारा येथे आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षीय उदघाटनपर भाषणात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे होते तर नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, कावेरी नाखले, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे, डॉ. रविंद्र वानखेडे, बाळा गभणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 
 
 
जातपात,धर्म, वंश विसरुन समाज संघटित राहीला पाहिजे तर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ आपणास घेता येईल. हाच खरा सामाजिक न्यायाचा उद्देश आहे असे खासदार कुकडे म्हणाले. आपण कुठल्याही जाती पंथाचे नसून सर्व प्रथम भारतीय आहोत अशी भावना जागृत झाली पाहीजे. त्यासाठी समाज उत्थानाचे कार्य करा, असेही ते म्हणाले. सामाजिक समतेचे जनक, सर्व प्रथम आर्थिक व सामाजिक समता प्रस्थापित करणारे महापुरुष म्हणजे राज्यर्षी छत्रपती शाहू महाराज, असे उपजिल्हाधिकारी निवडणूक विलास ठाकरे म्हणाले. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@