अमरनाथ यात्रेची धुरा 'एनएसजी' कमांडोंवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2018
Total Views |


श्रीनगर : अमरनाथ यात्रेसाठी जम्मू-काश्मीरमध्ये जाणाऱ्या भाविकांच्या रक्षणाची जबाबदारी आता 'नॅशनल सिक्युरिटी गार्ड' अर्थात 'ब्लॅक कॅट एनएसजी' कमांडोंवर सोपण्यात येणार आहे. केंद्र सरकारने नुकतीच याविषयी घोषणा केली असून अमरनाथ यात्रेदरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये एनएसजी कमांडोंचा तुकड्या तैनात करण्याला सरकारने मान्यता दिली आहे.

येत्या २८ तारखेपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे. यापार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये सक्रीय असलेल्या लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटना यात्रेकरुनवर हल्ला करण्याचा कट रचत असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळालेली आहे. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेमध्ये कसल्याही प्रकारची कमतरता राहू नये, म्हणून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने याविषयी घोषणा करत एनएसजी कमांडोच्या दोन तुकड्या, २० ड्रोन आणि रडार यंत्रणा तैनात करणार आहे. तसेच सीआरपीएफ आणि इतर सुरक्षा दलांची संख्या देखील यात्रे दरम्यान वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेमध्ये कसल्याही प्रकारची कमतरता राहणार नाही.

विशेष म्हणजे देशात पहिल्यांदाच अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी या ब्लॅक कॅट एनएसजी कमांडोंना तैनात करण्यात येणार आहे. देशातील अत्यंत उच्चस्तरीय सुरक्षा आणि सर्वात तरबेज कमांडो म्हणून या ब्लॅक कमांडोंना ओळखले जाते. देशात होणारे घातक अतिरेकी हल्ले उधळून लावण्यासाठी म्हणून १९८४ मध्ये यांची स्थापणा करण्यात आली होती. तसेच संपूर्ण देशामध्ये सध्या फक्त १४ हजार ५०० ब्लॅक कमांडो कार्यरत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@