योग दिनाची 'ही' सुंदर कलाकृती पाहिलीत का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |



ओडीसा : चौथा आंतरराष्ट्रीय योग दिन आज जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भारताबरोबरच जगाच्या कानाकोपऱ्यात आज नागरिक योग दिन साजरा करत आहेत, तसेच योग दिनाच्या शुभेच्छा देत आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्या वेगवेगळ्या कलाकृतींसाठी जगभर प्रसिद्ध असलेले प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी आज एका आगळ्यावेगळ्या कलाकृतीतून योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पटनायक यांनी योग दिनानिमित्त पुरीतील समुद्र किनारी वाळूचे एक अप्रतिम शिल्प कोरून सर्व जगाला योग्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.




 
'योगा फॉर हार्मोनी अॅण्ड पीस' या संकल्पनेवर  आधारित  हि कलाकृती बनवण्यात आली असून यामधून जागतिक शांतता आणि एकात्मतेच संदेश देण्यात आला आहे. या कलाकृतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह चार देशांच्या राष्ट्रप्रमुखांची प्रतिमा रेखाटण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये अमेरिका, चीन, उत्तर कोरिया या देशांचा समावेश आहे, तसेच यातून सर्वाना शांततेचा संदेश देण्यात आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@