झांजिबार, झांजिबार; जग हा वेड्यांचा बाजार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



आधुनिक जगात टुथपेस्ट, नेत्रांजन, प्रक्रियायुक्त मांस, बियर इत्यादी वस्तू बनविण्यासाठी अतिशय उपयुक्त असणारं एक पाणगवत झांजिबारच्या समुद्रकिनाऱ्यावर फार विपुल प्रमाणात उगवतं, असं आढळून आलं आहे.

 

भारताच्या नैऋत्येला हिंदी महासागराच्या पलीकडे म्हणजे आफ्रिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीवर एक देश आहे. त्याचं नाव आहे टांझानिया. आफ्रिकेच्या राजकारणातले एक ख्यातनाम मुत्सद्दी ज्युलियस न्येरेरे हे अनेक वर्ष त्या देशाचे अध्यक्ष होते. १९८५ साली त्यांनी राजीनामा दिला. आफ्रिका खंडातली व्हिक्टोरिया, टांगानिका आणि मालावी ही तीन प्रचंड सरोवरं आणि किलिमांजारो हे सर्वात उंच पर्वतशिखर टांझानियाच्या प्रदेशात येतं. या किलिमांजारो पर्वतातच नाईल नदी उगम पावते आणि व्हिक्टोरिया सरोवरातून पुढे इजिप्तमध्ये प्रवाहित होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत टांझानियाला म्हणत असतजर्मन ईस्ट आफ्रिका,’ कारण तो देश जर्मनांनी आपल्या ताब्यात ठेवलेला होता. त्याच्या अवतीभोवतीचे प्रदेशही ब्रिटन, पोर्तुगाल आणि बेल्जियम अशा युरोपीय राष्ट्रांच्या ताब्यात होते. १९१४ साली पहिले महायुद्ध सुरू झाल्यावर ब्रिटन आणि बेल्जियम या दोघांनी मिळून ही जर्मन वसाहत आपल्या ताब्यात आणली. तेव्हापासून म्हणजे १९१६ सालपासून त्या प्रदेशालाजर्मन ईस्ट आफ्रिकेऐवजीटांगानिकाअसं नाव पडलं.

 

या टांगानिका प्रदेशाच्या पूर्व किनाऱ्यावरदार--सलामनावाचं एक फार प्राचीन बंदर होतं. तीच या प्रदेशाची राजधानी होती आणि या दार--सलामच्या उत्तरेला समुद्रातच झांजीबार नावाचं सुमारे साडेसहाशे मैल किंवा दीड हजार चौरस किमी क्षेत्रफळाचं एक बेट होतं. हे बेट फारचं प्रख्यात होतं. कारण इथे लवंगांचं उत्पादन होत असे. कित्येक शतकांपासून हिंदुस्थान, पर्शिया आणि अरबस्तान या तीनही देशांतल्या व्यापाऱ्यांना झांजिबार माहीत होतं. आज झांजिबारमध्ये स्वाहिली भाषा बोलली जाते, पण तिच्यावर अरबी भाषेचा खूप प्रभाव आहे. झांजिबारच्या सुमारे पावणेचार लाख लोकसंख्येपैकी पुष्कळ लोक स्वत:लाशिराझीम्हणजे पर्शिया उर्फ इराणच्या शिराझ प्रांतातून आलेले असं म्हणवून घेतात. धर्माने इथले बहुसंख्य लोक मुसलमान आहेत, कारण बरीच शतकं इथे उमान (ओमान)च्या सुलतानाची सत्ता होती, परंतु इथे अरबीयुक्त स्वाहिलीबरोबरच गुजराती, हिंदी, उर्दू आणि कोकणी या भाषाही चालतात. म्हणजेच लोकांना समजतात. मूळच्या काठेवाडच्या, पण काही शतकापासून झांजिबारला स्थायिक झालेल्या हिंदू व्यापाऱ्यांची एक मोठी वसाहत इथे आहे. या व्यापाऱ्यांपैकी एक जण साठ-सत्तर वर्षांपूर्वी केव्हातरी काठेवाडमध्ये परतला. त्याच्याबरोबर त्याच्या झांजिबारमधील स्थानिक कृष्णवर्णीय आफ्रिकन वंशाचा मुसलमान नोकर नि त्याची बायकामुलंदेखील होती. हा व्यापारी वैष्णव होता नि त्याच्या घरातील एकंदर संस्कारांमुळे हा मुसलमान आफ्रिकन नोकर नि त्याचे कुटुंबीय पक्के कृष्णभक्त बनून गेले होते, अशी एक कथा आजही काठेवाडमध्ये सांगितली जाते. किती गमतीदार दृश्य असेल, डोळ्यासमोर आणून पाहा!

 

आफ्रिकन चेहऱ्यामोहऱ्याचा, कृष्णवर्णीय मुसलमान नोकर आपल्या धन्याबरोबर कृष्णभजनात रंगून गेला आहे! हिंदू धर्म आणि संस्कृती, कुठे, कसे भेटेल काही सांगता येत नाही. आमचं राष्ट्र, त्याचा धर्म, परंपरा यांच्याबद्दल अभिमान निर्माण होईल, अशा या गोष्टी आमच्या साहित्यिकांनी, कलावंतांनी, प्रसारमाध्यमांनी आवर्जून लोकांसमोर मांडायला हव्यात. पण छे! त्यांना सकारात्मक असं काही आवडतच नाही. गलिच्छ राजकारण नि निलाजऱ्या नट्या ही घाण चिवडायलाच त्यांना आवडतं. तर ते असो. पुढे घडलं ते असं की, टांगानिका हा ब्रिटिशशासित प्रदेश आणि झांजिबारची सल्तनत (म्हणजे झांजिबारचा सुलतान) यांनी एकत्र येऊन आपलं एक स्वतंत्र, सार्वभौम राष्ट्र निर्माण झाल्याचं जाहीर केलं. ‘टांझानियाहा नवाच देश निर्माण झाला. ही गोष्ट १९६४ सालची. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी राजा परांजपे आणि . दि. माडगुळकर या दोघांनी मिळूनपेडगावचे शहाणेनावाचा एक अफलातून चित्रपट बनवला होता. त्यातला स्वतः राजाभाऊंनीच रंगवलेला, झांजिबारचा व्यापारी असलेला श्रीमंत काका आणि वेड्यांच्या हॉस्पिटलातल्या समस्त वेड्यांनी मिळून गायलेलं, ‘झांजिबार, झांजिबार, जग हा वेड्यांचा बाजारहे गाणं म्हणजे अविस्मरणीय प्रकरण आहे. माडगुळकरांचे शब्द आणि दत्ता डावजेकरांचे सूर यांची भट्टी काही विलक्षणच आहे.

 

तर आज हा टांझानिया देश किंवा मुख्यत: त्यातलं झांजिबार बेट पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आलं आहे. आधुनिक जगात टुथपेस्ट, नेत्रांजन, प्रक्रियायुक्त मांस, बियर इत्यादी वस्तू बनविण्यासाठी अतिशय उपयुक्त असणारं एक पाणगवत झांजिबारच्या समुद्रकिनाऱ्यावर फार विपुल प्रमाणात उगवतं, असं आढळून आलं आहे. या शोधामुळे झांजिबारच्या मच्छीमारांना उत्पन्नांचं नवं साधन मिळाले आहे. प्राचीन काळापासून झांजिबारमधून लवंगांची निऱ्यात होतेच. आधुनिक काळात टांझानियाच्या भूमीत बऱ्यापैकी हिरे आणि सोनं सापडलं. त्यामुळे त्यांचीही निऱ्यात होतेच. आता त्यात पाणगवत या नव्या पदार्थाची भर पडली आहे. हे पाणगवत मुख्यत: युरोपकडं जातं. समुद्रकिनाऱ्यावर निसर्गत: उगवलेलं हे पाणगवत खुडायचं आणि गावात आणून व्यापाऱ्यांना विकायचं, हा एक किफायतशीर धंदा मच्छीमारांच्या बायका आणि मुलांना सापडला आहे. पण साध्या पाणगवताला एवढी मागणी आहे म्हटल्यावर अनेक हुशार लोकांनी आपली डोकी लढवली. निसर्गत: उगवलेलं पाणगवत खुडत बसण्यापेक्षा काहींनी विशिष्ट क्षेत्रात त्या पाणगवताच्या विशिष्ट जातींची रीतसर, लागवड सुरू केली आहे. नव्याने लागवड केलेली रोपं साधारण दोन महिन्यात खुडणीसाठी तयार होतात. म्हणजेच वर्षाला सहाबार पीक झालं. खुडलेलं पीक फुटकळपणे व्यापाऱ्यांना विकण्यापेक्षा एकत्रितपणे शहरात पोहोचवलं तर किफायत जास्त होईल, हे लक्षात आल्यावर मासळीविक्री सोसायट्यांप्रमाणेच पाणगवत विक्री सोसायट्या निघू लागल्या आहेत. एकंदरीत झांजिबार किनारपट्टी आनंदात आहे.

 

या घटनेवरून आठवण झाली. साबण, सुगंधी प्रसाधनं किंवा तत्सम उत्पादनांसाठी जी तेलं लागतात, त्यांना अत्यावश्यक तैल पदार्थ- ‘इसेन्शियल ऑईल्सम्हणून ओळखतात. ही तेलंदेखील विविध प्रकारच्या गवतांपासून मिळतात. त्यात लेमनग्रास आणि पामरोझा ही दोन विशेष प्रसिद्ध आहेत. आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या दोन्ही गवतांची रीतसर शेती केली जाते. कुठे दुबार, तर कुठे चौबार असं पीक घेतलं जातं. परंतु, आपल्याकडच्या काही प्रयोगशील मंडळींनी आता कोकणात या गवतांची लागवड सुरू केली आहे. त्यांच्या या प्रयोगांना भरघोस यश मिळतं आहे. देशात अन्यत्र कुठेही मिळू शकलेलं असं सहाबार पीक त्यांना कोकणच्या तथाकथित नापीक भूमीतून मिळतं आहे. कोकण प्रदेश ही भगवान परशुरामांची निर्मिती आहे आणि या प्रदेशाला त्यांचे वरदान आहे. फक्त डोकं वापरून आणि त्याला मेहनतीची जोड देऊन ते वरदान पदरात पाडून घेता आलं तरच!

 

अमेरिकेत मानव

 

पंधराव्या शतकाच्या अखेरी-अखेरीस अमेरिगो व्हेसपुक्सी, ख्रिस्तोफर, कोलंबस वगैरे युरोपीय संशोधकांनी अमेरिका खंड शोधून काढला. जसजसे युरोपीय वैज्ञानिक अमेरिकेचा अभ्यास करायला लागले, तसतसं त्यांच्या लक्षात यायला लागलं की, आपण ज्यांना रानटी टोळीवाले समजतो ते अतिशय समृद्ध अशा संस्कृतींचे वारसदार आहेत. मग त्यांना प्रश्न पडला की, एका बाजूला अटलांटिक नि दुसऱ्या बाजूला पॅसिफिक अशा विस्तीर्ण महासागरांचा आशिया-आफ्रिका-युरोप या सलग खंडांपासून बाजूला पडलेल्या या भूमीवर मानव गेला कसा? कुठून? केव्हा? या प्रश्नांना उत्तर म्हणून अशी उपपत्ती सांगण्यात येते की, आशिया खंडाचं अतिपूर्वेकडचं भूशिर, जे आज रशियात आहे नि अमेरिका खंडाचं अतिपश्चिमेकडचं भूशिर, जे आज अमेरिकन संयुक्त संस्थानांपैकी अलास्का या प्रांतात येतं, या दोघांमध्येबेरिंगनावाची एक बारीकशी सामुद्रधुनी आहे. तेव्हा मानवप्राणी आशियातून बेरिंग सामुद्रधुनी ओलांडून अलास्कामार्गे अमेरिका खंडात प्रवेशला आणि मग खंडभर पसरला. ही घटना केव्हाची? तर सुमारे अकरा ते साडेअकरा हजार वर्षांपूर्वीची. पण आता ही उपपत्ती मोडीत काढणारा पुरावा ब्रिटनच्या लिव्हरपूल विद्यापीठातील पुरातत्त्व शास्त्रज्ञ प्राध्यापिका सिल्व्हिया गोंझालेस यांना सापडला आहे.

 

अमेरिकेतील मेक्सिको देशाची राजधानी मेक्सिको सिटीपासून जवळच असलेल्या प्यूफब्ला या ठिकाणी एका तळ्याकाळी त्यांना मानवी पावलांचे ठसे मिळाले आहेत. सेरो टेलोकिलो नावाच्या ज्वालामुखी पर्वताजवळ हे तळं आहे. प्रा. सिल्व्हिया म्हणतात, “काही माणसं या तळ्याकाठी ओल्या मातीत उभी असताना ज्वालामुखीचा उद्रेक झाला असावा. ती माणसं पळाली असतील. ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या गरम राखेने लगोलग त्या पाऊलखुणांना झाकून टाकलं असावं. त्यामुळे ती पावलं आजही जशीच्या तशी दिसत आहेत. निसर्गानेच जणू आम्हाला दाखवण्यासाठी हा चमत्कार जपून ठेवला होता.” निसर्गाने आपली ही कालकुपी किती वर्षांनी उघडली, माहीत आहे का? ४० हजार वर्षांनी! तात्पर्य, ४० हजार वर्षांपूर्वी अमेरिकेत मनुष्यप्राणी अस्तित्वात होता आणि त्या पावलांच्या मोजमापांवरून तरी तो आजच्या मानवासारखाच होता.

@@AUTHORINFO_V1@@