आगामी मुख्यमंत्री सेना-भाजपने एकत्र ठरवावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018
Total Views |



 

 
कोल्हापूर : आगामी निवडणुकांनंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होईल, हे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी एकत्र बसवून ठरवले पाहिजे,असे मत व्यक्त करत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युतीचे अप्रत्यक्ष समर्थन केले. दुसरीकडे, भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढल्यास मतविभाजनाचा फायदा विरोधी पक्षांना होईल, असेही ते यावेळी म्हणाले. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मंगळवारी मुंबईत शिवसेनेचा ५२ वा स्थापना दिवस सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीनंतर मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल असे म्हटले होते. या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, प्रत्येक पक्षाला आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री असावा असे वाटते. परंतु गेल्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपद हे भाजपकडे आले. आता येत्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने एकत्र येऊन मुख्यमंत्री कोण होईल हे ठरवावे, अन्यथा त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होईल, असे चंद्रकांतदादा यांनी सांगितले.

... तर राष्ट्रवादीचे हसेच होईल

राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापुरात गुरुवारी मुख्यमंत्र्यांनाआऊटस्टँडिंग चिफ मिनिस्टरअसा प्रतीकात्मक उपहासात्मक पुरस्कार देवून आंदोलन करणार आहे. ही बाब यावेळी चंद्रकांचदादा पाटील यांच्या निदर्शानास आणून देण्यात आली असता ते म्हणाले की, आपला देश सुंदर असून या ठिकाणी प्रत्येकाला कोणतेही आंदोलन करण्याचा अधिकार आहे. परंतु मुख्यमंत्र्यांचे काम जोमाने सुरू असून यामुळे राष्ट्रवादीच्या आदोलनाचे जनतेत हसेच होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.

@@AUTHORINFO_V1@@