शिर्डीत स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018
Total Views |



शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीच्या वतीने श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त २० जून या ‘जागतिक स्वच्छता दिनाचे औचित्य साधून स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला असून या कार्यक्रमाचा शुभारंभ संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला. स्वच्छता अभियान शुभारंभ कार्यक्रम संस्थानचे विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे व विश्वस्त तथा नगराध्यक्षा योगिता शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी संस्थानचे उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, प्रशासकीय अधिकारी सूर्यभान गमे, दिलीप उगले, सर्व विभागांचे खातेप्रमुख, आरोग्य विभागाचे विभागप्रमुख संजय गायकवाड व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. २० जून हा ‘जागतिक स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. या 'जागतिक स्वच्छता दिनाचे औचित्य साधून श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त या स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थानच्या साईआश्रम भक्तनिवास परिसर, नवीन भक्तनिवासस्थान (५०० रुम) परिसर आदी ठिकाणी स्वच्छता करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@