सामाजिक व शैक्षणिक स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करा : हंसराज अहिर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
चंद्रपूर : लोकसभा क्षेत्रातील युवक - युवतींना कौशल्य सिद्धी होत त्यांना अभिनव तंत्रज्ञानाचे धडे ज्ञानार्जन होत आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्वयंपूर्णतेकडे वाटचालीच्या दृष्टीने केंद्रीय रसायन व उर्वरक मंत्रालयाच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेले सेंट्रल इन्स्टिटयूट ऑफ प्लास्टिक इंजिनीरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या यशस्वी प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षण समारोह तसेच ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून दिन दयाल ग्रामीण कौशल्य योजनेचा शुभारंभ काल चंद्रपूर येथे पार पडला. 
 
 
 
या समारोहाला राजकीय, प्रशासकीय व सामाजिक बांधिलकी जोपासासऱ्या अनेक गणमान्य व्यक्ती व या योजनांच्या माध्यमातून विशेष तंत्रज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थिनीची उपस्थिती होती. सिपेटचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना टाटा समुहासारख्या उद्योगाकडून मिळालेले नियुक्ती पत्र व प्रमाणपत्राचे वितरण यावेळी केले. चंद्रपूर येथे स्थापन झालेल्या सिपेटच्या माध्यमातून आजपर्यंत २१७० प्रशिक्षणार्थींना यशस्वी प्रशिक्षण देण्यात आले असून १७०० च्या वर प्रशिक्षणार्थींना रोजगार प्रदान करण्यात आला याचा समाधान यावेळी व्यक्त केला. 
 
 
 
दीनदयाल ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रातील होतकरू विद्यार्थ्यांना आयटी. रिटेल, बी.पी.ओ., इंग्लिश ट्रैनिंग इत्यादींचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून त्यांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. समर्थ व कौशल्य भारत घडविण्याचा मानस आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा असल्याने हे सिपेट, दीनदयाल ग्रामीण कौशल्य योजना लोकसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी नक्कीच मैलाचा दगड ठरेल. विशेष म्हणजे या प्रशिक्षण काळात निवास, जेवण, प्रशिक्षण शुल्क व प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य विद्यार्थ्यांना सर्व मोफत पुरविले जातील. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सिद्ध भविष्य घडवावे असे आवाहन यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी केले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@