बॉम्बस्फोटांच्या देशात वाढतंय ऑनलाईन जाळं...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2018   
Total Views |



 

गेल्या २० वर्षांपासून अफगाणिस्तान राजकीय, सांस्कृतिक, व्यावसायिक दृष्ट्या अस्वस्थ आहे. दहशदवादाच्या वाढत्या वसाहती, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अमेरिकेचा मोठ्याप्रमाणावर हस्तक्षेप यामुळे येथील जनजीवन विस्कळीत असलं तरी सध्या मात्र ऑनलाईन शॉपिंग क्षेत्रात अफगाणिस्तान प्रगती करताना दिसत आहे. गेल्या दोन वर्षांपासून बॉम्बस्फोटांमुळे होणारे मृत्यू, अशांतता यामुळे लोकांची ऑनलाईन शॉपिंगवर झुंबड वाढत आहे.
 

११ सप्टेंबर २००१ ला न्यूयॉर्कच्या ट्‌विन टॉवरवर हल्ला चढवून दहशतवाद्यांनी अफगाण भूमीवरच आपले बस्तान मांडून तेथून जगभर अनागोंदी माजवण्यास सुरुवात केली होती. यामुळे २१ सप्टेंबर २००१ रोजी पासून अमेरिकन तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जार्ज बुश यांनी आपला मोर्चा अफगाणिस्तानकडे वळविला. अमेरिकन सैन्य जवळपास सोळा वर्ष अफगाण भूमीवर ठाण मांडून बसले होते. यादरम्यानच्या काळात जवळपास अडीच हजार अमेरिकी सैनिक मारले गेले, तर वीस हजारच्यावर अमेरिकन सैनिक जायबंदी झाले. याच दरम्यानच्या काळात जवळपास ७० ते ८० हजार अफगाण नागरिक मृत्युमुखी पडले. यामुळे येथील स्थानिक नागरिक घराबाहेर पडण्यास तयार नव्हते तर लाखोजण बेघर झाले होते. याचा थेट परिणाम व्यापार व आर्थिक विकासाबरोबरच दैनंदिन जीवनावर होत होता. कारण जर खरेदी करणारे कोणी नसेल तर विकायला कोण मांडणार, विकणारा कोणी नसेल तर खरेदी करणार कशी, अशीच काहीशी अवस्था येथील बाजारपेठांमध्ये झाली होती. यामुळे भल्यामोठ्या बाजारपेठा बंद पडल्या होत्या तर काही व्यापारी स्वतःचा जीव धोक्यात टाकून स्थानिक दैनंदिन जीवन सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र येथील अपरिपक्व लोकशाही, अप्रशिक्षित लष्कर, दहशतवादी संघटना व अमेरिकन सैन्याचा धुडगूस यामुळे उघड व्यापार व खरेदी-विक्री करणं शक्य नसल्याने हळू हळू छुप्या पद्धतीने दैनंदिन गरजा भागवण्याचे काम चालू होते. मात्र अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तान पंतप्रधान अश्रफ घनी यांच्यात दहशदवाद बिमोड, व्यापारासंबंधित झालेल्या चर्चामधून व भारताने मदतीचा हाथ दिल्याने येथील परस्थिती हळू हळू पूर्वपदावर येताना दिसून येत आहे. याचाच परिणाम ऑनलाईन शॉपिंगच्या वाढत्या आलेखावरून दिसत आहे.

 

सतत होणारे हल्ले, गोळीबार, बॉम्बस्फोट व महिलांवरील भर रस्त्यावर होणारे अत्याचार या भीतीपोटी लोक खरेदीसाठी घराबाहेर पडत नाहीत हे लक्षात आल्यानंतर याचा फायदा काही स्टार्ट अपर्सने घेतला. AzadBazar.af, afom.af, JVBazar.com अशा अनेक ऑनलाईन शॉपिंग साईट सुरु करून त्यांनी व्यवसाय सुरु केला. सध्या यावर घरं, कॉस्मेटिक्स, कॉम्पुटर, किचनवेयर, फर्नीचर यासारख्या वस्तू विक्रीस असून हा व्यवसाय तेजीत आहे. लोकांना घरबसल्या, हवं तसं खरेदी करता येत असलं तरी वस्तू घरपोहच करणं वाटतं तेवढं सोप्प नाही. यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना स्वतःचा जीव मुठीत धरून डिलिव्हरीच काम करावं लागतं. सध्या जरी येथील ऑनलाईन व्यवसाय पाळण्यात असला तरी येत्या काळात मोठं रूप धारण करून पारंपरिक बाजारपेठेची गणितंच बदलण्याची शक्यता आहे. हेच बदलतं व्यावसायिक गणित अफगाणिस्तान व मुस्लीम बहुल भागात क्रांती ठरणार आहे. ऑनलाईन शॉपिंगच्या वाढत्या आलेखामागे जरी येथील सामाजिक व राजकीय अशांतता असली तरी यामध्ये भारताचा मोठा वाटा असल्याचे विसरून चालणार नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानसोबतच्या व्यापारीकरणाला प्रोहत्सान दिले आहे. याचेच यश अफगाणिस्तानमधील गेल्या दोन वर्षातील ऑनलाईन शॉपिंगच्या वाढत्या आलेखावरून दिसून येत आहे!

@@AUTHORINFO_V1@@