आर्मी, नेव्ही व एअर फोर्स भरतीपूर्व प्रशिक्षण व सुरक्षा रक्षक प्रशिक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2018
Total Views |
 
 तांत्रिक व क्लार्क निवासी प्रशिक्षण
 

भंडारा :  महाराष्ट्र शासन पुरस्कृत महासैनिक प्रशिक्षण केंद्र , सर्वे क्रमांक 224 सागवान ( गायरान ) बुलढाणा येथे 30 जून ते 23 जुलै 2018, 27 जुलै ते 28 ऑगस्ट व 25 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर2018 या कालावधीत आर्मी, नेव्ही व एअर फोर्स व सुरक्षा रक्षक तसेच तांत्रिक व क्लार्क निवासी प्रशिक्षणाचे आयोजन केलेले आहे. शिबीरामध्ये सैन्यातील निवृत्त अधिकारी व जवान यांच्याकडून उत्तम प्रशिक्षण दिले जाते. भंडारा जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, भंडारा येथे अटी व शर्तीमध्ये बसत असेल त्यांनी आपले नाव कार्यालयात नोंदवावे. तसेच उमेदवारांना राहणे, प्रशिक्षण व दोन ड्रेस मिळून एकूण 6 हजार 650 एवढा खर्च येईल. इच्छुकांनी सदर शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भंडारा यांनी केले आहे.
 
 
सोल्जर जिडी- वयोमर्यादा 17 ½ ते 21 वर्ष, ऊंची 168 से.मी., वजन 50 किलो, शैक्षणिक पात्रता 10 वी पास ( 45 टक्के आणि प्रत्येक विषयात 33 मार्क). सोल्जर जिडी (एस.टी.)- वयोमर्यादा 17 ½ ते 21 वर्ष, ऊंची 162 से.मी. वजन 48 किलो, शैक्षणिक पात्रता 8 वी पास. सोल्जर टेक- वयोमर्यादा 17 ½ ते 23 वर्ष, ऊंची 167 से.मी., वजन 50 किलो 12 वी पास सायंससह फिजीक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटीक्स व इंग्रजी ( 50 टक्के आणि प्रत्येक विषयात 40 टक्के मार्क ). सोल्जर क्सर्स/एस के टी – वयोमर्यादा 17 ½ ते 23 वर्ष, ऊंची 162 सेमी., वजन 50 किलो, शैक्षणिक पात्रता 12 वी पास आर्ट, कॉमर्स आणि सायंस ( 50 टक्के आणि प्रत्येक विषयात 40 टक्के मार्क आणि 10 वी किंवा 12 मध्ये इंग्रजी, मॅथेमॅटीक्स, अकाऊंटींग, बुक किपींग प्रत्येक विषयात 40 टक्के मार्कसह ) या तीनही पदांना छाती 77-82 से.मी. असणे आवश्यक आहे.
 
 
सोल्जर ट्रेडमॅन- वयोमर्यादा 17 ½ ते 23 वर्ष, ऊंची 168 से.मी., वजन 48 किलो, शैक्षणिक पात्रता 10 वी पास. सोल्जर ट्रेडमॅन 17 ½ ते 23 वर्ष, ऊंची 168 से.मी., वजन 48 किलो, शैक्षणिक पात्रता 8 वी पास ( हाऊस किपर आणि मेस वेटर ) या दोन्ही पदांना छाती 76-81 से.मी. असणे आवश्यक आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@