उपविभागीय कार्यालयात समस्या घेऊन येणारा प्रत्येक नागरिक आनंदी होवून जावा- सुधीर मुनगंटीवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
 
बल्लारपूर येथील उपविभागीय कार्यालय इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न



चंद्रपूर : बल्लारपूर येथील उपविभागीय कार्यालयात समस्या घेऊन आलेला प्रत्येक नागरिक आनंदी होवून गेला पाहिजे अशा प्रकारचे अधिकारी व कर्मचा-यांनी काम करावेअसे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बल्लारपूर येथील उपविभागीय कार्यालय इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमात ते आज होते.
 
 
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर तर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, बाधकांम विभागाचे अधीक्षक अभियंता डी.के.बालपांडे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, कार्यकारी अभियंता मनोज जैस्वाल, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, पंचायत समिती सभापती गोंविदा पोडे, नपच्या उपाध्यक्षा मिनाताई चौधरी, मुख्याधिकारी विपीन मुद्दा यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
यावेळी ना.सुधीर मुनगंटीवार म्हणाले, उपविभागीय कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचा-यांना सर्व सोयी सुविधा निर्माण करुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कार्यालायतील प्रत्येक कर्मचा-यांनी आपली जबाबदारी समजून या कार्यालयात आलेल्या नागरिकांची कामे करणे गरजेचे आहेअसे त्यांनी सांगितले. बल्लारपूर शहरात बस्थस्थानक, पोलीस स्टेशन, स्टेडीयम, नाट्यगृह आदी विकासकामे पूर्ण झाली असून लवकरच त्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. बल्लारपूरमध्ये नागरिकांसाठी मोठया प्रमाणात सोयी सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. नगर परिषदेच्या माध्यमातून बल्लारपूर शहर स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी शहरातील नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही मुनगंटीवार यांनी केले.
 
 
या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर म्हणाले, देशात व महाराष्ट्रात आमचे सरकार आले तेव्हापासून सिंचन, शेती, कौशल्य विकास, पर्यटन, रोजगार निर्माण करण्याचे काम आम्ही मोठया प्रमाणात करीत आहोत. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात मोठया प्रमाणावर विकासकामे केली आहेत. सैनिकी शाळा , बॉटनिकल गार्डन, वन अकादमी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र असे विविध विकास प्रकल्प त्यांच्या पुढाकाराने कार्यान्वित होत आहे. या विभागाचा खासदार म्हणून मला ह्याचा अभिमान असल्याचे  अहिर यावेळी बोलताना म्हणाले. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@