नागरिकांनी मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी शेखर सिंह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
गडचिरोली :  जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. दिनांक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा वापर आगामी लोकसभा व विधानसभा सार्वत्रीक निवडणुकीत करण्यात येणार असल्याने नागरिकांनी आणि राजकीय पक्षानी त्यांचेवतीने मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता यांची नेमणूक करुन उपरोक्त दिनांकास वयाची 18 वर्ष पुर्ण करणारी व्यक्ती मतदार म्हणुन नोंद होण्यापासून वंचीत राहणार नाही याकरीता सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज येथे केले. मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण बाबत माहिती देण्याकरीता राजकीय पक्षांची बैठक व पत्रकार परिषदचे संयुक्त आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले, यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. 
 
 
 
पत्रकार परिषदेत माहिती देतांना जिल्हाधिकारी सिंह म्हणाले की, जास्तीत जास्त पात्र मतदारांची नोंदणी व्हावी, मतदार यादी जास्तीत जास्त अचुक व्हावी व मतदारांना मतदान विषयक चांगल्या सुविधा देता याव्यात या उद्देशाने जिल्ह्यात विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, यांचे मार्फत मतदान केंद्राचे क्षेत्रात मतदारांची पडताळणी करणे, मतदार केंद्राचे सुसुत्रिकरण करणे, मयत, दुबार व स्थलांतरीत मतदारांची नावे वगळणे याकरीता नमुना 7 भरावे लागेल. नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी नमुना 6 भरावे लागेल. त्याचप्रमाणे कायम स्थलांतरीत मतदारांची नावे वगळणे याकरीता सुध्दा नमुना 7 भरावे लागेल, आणि एकाच मतदार संघातील मतदार यादी भागात स्थलांतरणाकरीता नमुना 8 अ भरावे लागणार आहे. 
 
 
 
छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम
 
 
भारत निवडणूकआयोगानी 1 जानेवारी ,2019 या अर्हता दिनांकावर आधारीत विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दिनांक 11 मे,2018 पुर्वी प्रसिध्दी व अधिकारी यांचे प्रशिक्षण पुर्ण करण्यात आले आहे, दिनांक 15 मे 2018 ते दि.20 जून,2018. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घरोघरी भेटी देवून नवीन मतदारांची नोंद घेत आहेत. दि.21 जून,2018 ते दि.31 जूलै,2018 पर्यंत मतदान केंद्राच्या इमारतीची तपासणी करुन मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण करण्यात येईल.यामध्ये शहरी मतदान केंद्रावर मतदारांची संख्या 1400 व ग्रामीण मतदान केंद्रावर मतदारांची संख्या 1200 पेक्षा जास्त राहणार नाही. यादृष्टीने जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्राचे विभाजन करण्यात येणार आहे. दि. 01 ऑगस्ट,2018 ते दि. 31 ऑगस्ट,2018 कंट्रोल टेबल अदयावत करणे व पुरवणी मतदार यादी एकत्रिकरण व विलीनीकरण करुन प्रारुप मतदान यादी तयार करण्याचे कामे करण्यात येतील. दि. 01 सप्टेंबर, 2018 एकत्रिकरण करण्यात आलेली प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केली जाईल. आणि याबाबत हरकती असल्यास दि.01 सप्टेंबर, 2018 ते दि.31 ऑक्टोबर,2018 दावे व हरकती स्विकारण्यात येतील. दि. 30 नोव्हेंबर, 2018 पुर्वी दावे व हरकती निकालात काढण्यात येईल. दि. 03 जानेवारी ,2019 पुर्वी अद्यावत पुरवणी मतदार यादीची छपाई करुन दिनांक 04 जानेवारी ,2019 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे. 
@@AUTHORINFO_V1@@