परिश्रमाशिवाय अपेक्षित निकाल?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2018   
Total Views |
परिणाम कुण्या एखाद्या खास दिवशी आणि समयी एका झटक्यात येत असतात... परंतु, त्यामागे क्षणा-क्षणाची मेहनत आणि अगणित अडचणींच्या बाहेर न आलेल्या अशा कथा गुंफल्या गेलेल्या असतात की, ज्यांचा तपशील एका क्षणात देता येत नाही.
ही प्रत्येक वेळचीच कथा आहे. एवढ्यातच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे निकाल आले, तेदेखील हेच सांगून गेले. काही दिवसांनी घोषित होणारे बोर्डाच्या परीक्षेचे निकालही याला अपवाद नसणार.
तर मग, कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काही अपवाद किंवा चमत्कार होईल काय? म्हणजे मेहनतीशिवाय अपेक्षित निकाल? किंवा असेच काही...
 
 
कर्नाटक निवडणुकीचे निकाल 15 मे रोजी येणार आहेत. लोक भलेही आपली डोकी नकारार्थी हलवीत आहेत, परंतु कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना तर असेच वाटत आहे. पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या म्हणण्यावर किती सहमत होतात, हे सांगणे कठीण आहे, परंतु ते कॉंग्रेसमध्ये काही विशेष परिश्रम न करता, खूप मोठी आशा उत्पन्न करू इच्छित आहेत. खरेतर जनतेच्या मनात काय आहे, हे ओळखणे कठीणच असते; परंतु राजकीय नेत्यांची पावले सांगून जातात की, कुठल्या चालीने कुठले अंतर किती वेळात पार होणार आहे ते!
 
 
निवडणुकीच्या प्रचारधुमाळीत जेव्हा राहुल गांधी सांगतात की, निवडणुकीनंतर त्यांना 15 दिवसांची विश्रांती हवी आहे किंवा आगामी सुट्या कुठे घालवायच्या, तर याकडे कसे बघायला हवे? याच्या उत्तरात एक आणखी प्रश्न आहे-
जर बोर्डाच्या परीक्षेदरम्यान, कुणा विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिका आणि मेहनत याऐवजी आजीच्या गावातील पेरूचे बगिचे आणि आंब्याचा मोहर आठवत असेल, तर याकडे कसे बघायला हवे? असो. निकाल जे येतील ते येतील.
आज स्थिती ही आहे की, भलेही कॉंग्रेस या निवडणुकीला उत्तर विरुद्ध दक्षिण असा रंग देण्याच्या प्रयत्नात असली, तरी दक्षिणेत भाजपा पाय रोवूच कशी शकते- हे असले प्रश्न स्थानिक स्तरावर आपापले महत्त्व कमी करीत आहेत. (यातही कर्नाटक यासाठी खास आहे, कारण इथे आधीही जनतेने भाजपाचे सरकार निवडून आणले आहे.)
सध्यातरी, भारतीय जनता पार्टीची तळागाळातली मेहनत आणि कॉंग्रेसी युवराजांच्या कच्चेपणाचे ताजे किस्से, कर्नाटकात पुन्हा एकदा लोकांच्या जिभेवर आले आहेत.
 
 
-दिल्ली तसेच 20 राज्यांत सत्तारूढ असलेल्या भाजपाचे अध्यक्ष, दिल्लीतील शक्तिसंपन्न द्वेषाच्या अरुंद बोळी सोडून, उन्हात-धुळीत प्रत्येक बूथप्रमुखापर्यंत पोहोचले आणि या तळागाळातल्या संपर्काने पक्षाचा आत्मविश्वास द्विगुणित करून टाकला.
-कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अचानक कर्नाटकात अवतरले आणि नंतर ‘मोदीं’ना आव्हान देत, दंड थोपटले. त्याने घाबरलेल्या पक्षाचा आणखीनच थरकाप उडवून टाकला. आता जे व्हायचे ते होवो, राहुलजींच्या मुळे होईल!
या गमतीने सांगितलेल्या गोष्टी नाहीत. सत्य हे आहे की, भाजपाच्या (आसामच्या अजेय मानल्या गेलेल्या किल्ल्यापासून ते त्रिपुराच्या अभेद्य लाल गढीपर्यंत) उत्तुंग यशाच्या उलट, कॉंग्रेसी किरकिरीचे एक राहुल गांधी मॉडेलदेखील सोबतच विकसित झाले आहे. कॉंग्रेस आणि प्रगतिशील टोळी सतत सांगत असते की, बस, एका निकालाचीच तर गोष्ट आहे आणि मग हा अपयशाचा पूर्णच्या पूर्ण ‘डोंगर’ हवेत उडून जाईल... कॉंग्रेस आणि त्यांच्या मागच्या टोळ्यांसाठी मार्ग खुला होऊन जाईल. स्वप्न तर चांगलेच आहे. कारण, भाजपाविरोधकांनी, त्यांच्या विरुद्ध लागलेल्या प्रत्येक निकालानंतर, त्यापासून काही धडा घेण्याऐवजी त्यांचा राजकारणाचा ओरडा अधिक कर्कश आणि समाजविभाजक होत गेला. (कर्नाटकात ‘लिंगायत विवाद’ याचे उदाहरण सांगता येईल. जो गुजरातमध्ये हिंदूंना विभाजित करणार्‍या राजकारणाचाच एक पुढचा प्रयोग आहे).
 
 
परंतु, राजकारणातील या संधिसाधू विदूषकांना जनता आता चांगली ओळखून चुकली आहे आणि हे सर्व समजून उमजून ती आपली प्रतिक्रियादेखील नोंदवीत आहे. कर्नाटकात जनता विचारत आहे की, असे काय कारण आहे की, सदर्‍यावर उलटे जानवे घालण्याची गोष्ट असो वा मंदिरांमध्ये घाईघाईने माथा टेकवणे असो, कॉंग्रेसचे हिंदुप्रेम केवळ निवडणुकीच्या वेळीच आणि केवळ एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील मतदात्यांना दाखविण्यासाठीच का असते? प्रश्न काही चूक नाही. पक्षात जर खरोखरच हिंदू विचारांप्रती थोडीफार तरी आस्था आहे, तर धर्मांतरणाच्या विकराल समस्येकडे किंवा गौरक्षेबाबत संवैधानिक जबाबदारीकडे हा पक्ष सदैव पाठ करून का असतो?
 
या दुतोंडी आचरणाला, भाजपाची लक्ष्यकेंद्रित एकटक दृष्टी आणि एकात्म मानव दर्शनावर आधारित धोरणांनुसार सातत्याने समर्पित भावनेने करण्यात येणार्‍या कार्यांमुळे, सार्‍या देशभर थेट आव्हान मिळत आहे. आज दक्षिणेतही भाजपाच्या ‘हादर्‍या’चा हा चमत्कार एकाएकी झालेला नाही. भाजपा, त्याचे समर्थक आणि कार्यकर्ते यांच्या परिश्रमाची छन्नी (या राज्यात आणि याच्या बाहेरही) बर्‍याच काळापासून सतत चालत राहिली आहे. सत्तेच्या आत असो किंवा बाहेर, परंतु सदैव समाज आणि त्यांच्या समस्यांच्या नजीकच. भाजपाची वाटचाल अडविणार्‍या आशंकांचे मोठमोठे पहाड हळूहळू, एकेक करून, याच वैचारिकतेच्या आणि समाजातील भारतीय भावनेला तासणार्‍या छन्नीनेच तर कापून काढले आहेत.
प्रत्येक परीक्षेत भाजपाला यश मिळाले तर त्याच्यामागे परिश्रमाची पराकाष्ठा होती. अपयश मिळाले तर बोध घेण्याची तळमळ होती. धडा घेण्याची आस असल्यामुळे त्याचे हात कधीही रिकामे राहिले नाहीत. भाजपा अशा रीतीने वाढली आहे.
हे स्पष्ट आहे की, चुकांपासून काहीही बोध घेतला नाही, तर त्याहून जास्त मोठ्या चुका होतात. अशात, जो चुकांनाच मानत नाही, त्याला काय म्हणावे? राहुलजींच्या नेतृत्वात कॉंग्रेससोबत असेच काहीसे होत आहे.
 
 
स्वप्नांची पारख, सत्याच्या टणक जमिनीवर होते. जसे, बिहारमध्ये भाजपाचे झाले होते. झटका मोठा होता. भाजपाने गांभीर्याने त्याचा बोध घेतला. स्वत:त सुधारणा केली. परंतु, दुसरीकडे काय झाले? इकडे पाऊल स्थिरावलेही नाही आणि स्वप्नाळू दंभ अंगदापेक्षाही मोठा झाला!
भ्रष्टाचाराच्या मुद्यावर लोकसभा निवडणुकीत चित झालेल्यांनी लालूप्रसादांसोबत हातमिळवणी करून जातीय समीकरणांची एक कामचलाऊ नाव अवश्य बनली; परंतु भ्रष्टाचार आणि अहंकाराच्या सातत्याने जड होत गेलेल्या आरोपांमुळे, ती नाव काही अंतरानंतर बुडाली. काही संधी होत्या जिथे काही होऊ शकत होते; परंतु काहीही झाले नाही.
उदाहरणार्थ, गुजरात- ज्यासाठी राहुल गांधींनी पूर्ण ताकद लावल्यानंतरही, भाजपाच्या मतांची टक्केवारी अजून वाढली. चुकांपासून काही शिकले नाही तर आणखी मोठ्या चुका होणारच होत्या. एखाद-दुसर्‍या पोटनिवडणुकीत मिळालेल्या मोहरीएवढ्या यशाला पहाड समजणे आणि भाजपाच्या हिमालयासारख्या अस्तित्वाला सतत नाकारत राहणे! भाजपाविरोधी समूहांनी गेल्या काही वर्षांत याच्याशिवाय दुसरे केले तरी काय?
 
 
सहज समजण्यासारखी गोष्ट आहे की, देशाच्या सर्वात जुन्या पक्षाची झीज आणि भाजपाचा सातत्याने वाढता पसारा यांच्यामागे जर काही असेल तर ते अतिशय परिश्रमाने जिंकलेला जनतेचा विश्वासच आहे. देशातील सर्वात मोठा पक्ष, लोकशाहीच्या आकांक्षांचा अग्रदूत बनलेला आहे, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.
शेवटी काय, जसे कर्म तसे त्याचे फळ मिळणारच. निकाल तर निश्चितच येणार आणि ते परीक्षार्थीच्या मनाला समजावण्यासाठी येत नाहीत. ही बाब भाजपा, कॉंग्रेस वा अन्य कुणा पक्षालादेखील अगदी लागू होते.
कसेही करून, परीक्षेच्या वेळी सुटी आणि कामाच्या वेळी आंब्याचा मोहोर! अटकळबाजीची पतंग सांगत आहे की, विद्यार्थ्याचे मन परीक्षा खोलीच्या खिडकीतून बाहेर कुठेतरी उडून राहिले आहे...
@@AUTHORINFO_V1@@