"माफी मागा नाहीतर १०० कोटी रुपये भरा", सिद्धारामाय्यांची मोदींना नोटीस

    07-May-2018
Total Views |

 
कर्नाटक निवडणूक प्रचार जोरात सुरु आहे, त्याचबरोबर त्याने राजकीय वातावरण मात्र पेटले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि कर्नाटक भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येडीयुरप्पा यांना माफी मागण्याची कायदेशीर नोटीस बजावली आहे.
 
 
सिद्धरामय्या यांनी या तिन्ही भाजप नेत्यांवर मानहानीचा दावा केला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान अपमानकारक शब्दांचा वापर केल्याचे कारण त्यांनी दाखविले आहे. सिद्धरामय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावताना त्यांना "सीधा रुपय्या" असे संबोधले होते. त्याचबरोबर कर्नाटक काँग्रेससाठी पैसा सर्वात मोठी बाब असल्याचे त्यांनी प्रचारादरम्यान म्हटले आहे, असा आरोप त्यांच्याद्वारे लावला गेला आहे.
 
 
कर्नाटक काँग्रेसची सरकार १०%च्या सरकार असल्याचे वक्तव्य भाजपतर्फे करण्यात आले होते. येथे माफिया आणि भ्रष्टाचार मोठ्याप्रमाणात चालतो, असा देखील उल्लेख केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या यांच्याद्वारे मानहानीचा दावा दाखल केला गेला आहे. न्यायालय यावर काय निर्णय देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.