‘बदामी’ चर्चेगळू...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
 
सिद्धरामैय्या यांनी बागलकोटमधल्या बदामी आणि म्हैसूर जवळच्या चामुंडेश्वरी या दोन मतदार संघांमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धरामैय्या यांच्यासाठी चामुंडेश्वरीपेक्षा बदामी हा मतदार संघ अधिक सुरक्षित मानला जातो. ‘कुरूबा’ म्हणजेच धनगर समाजाचे मतदार याठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत, तर या मतदार संघात दलित आणि मुस्लीम समाजाची मतेही निर्णायक ठरणारी आहेत. याचीच दखल घेत सिद्धरामैय्या यांनी बदामीतूनही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, सिद्धरामैय्या यांची लढत दोन्ही मतदार संघात खडतर आहे.
 
कर्नाटकमधील बागलकोट जिल्हा म्हटला, तर त्या ठिकाणी सध्या काँग्रेसचेच वर्चस्व आहे. १९५७ पासून काही अपवाद सोडले, तर या ठिकाणी काँग्रेसच्याच बाजूने जनतेने कौल दिला. मात्र, यावेळी सिद्धरामैय्या आणि श्रीरामुलू हे दिग्गज समोरासमोर उभे ठाकल्याने बागलकोटमधील बदामी मतदारसंघातील निवडणूक यावेळी चर्चेचा विषय ठरली आहे. उत्तर कर्नाटकातील मतदार संघांचा फायदा पाहता, मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांना यावेळी बदामी मतदार संघातून उमेदवारी देण्याचा निर्णय काँग्रेसतर्फे घेण्यात आला. असे असले तरी भाजपनेही सिद्धरामैय्या यांना कोंडीत पकडण्याची व्यूहरचना आखली आहेच. गेल्या वेळी निवडणुकांदरम्यान झालेल्या अंतर्गत बंडाळीचा फटका भाजपला बसला होता. त्यामुळे जिल्ह्यातील ७ पैकी ६ जागा या काँग्रेसच्या वाट्याला आल्या होत्या. परंतु, त्यापासून धडा घेत यावेळी भाजपने उत्तम प्रकारे काँग्रेसला घेरण्याची व्यूहरचना तयार केली आहे. भाजपने बदामीतून बेळ्ळारीचे खासदार श्रीरामुलू यांना उमेदवारी देत सिद्धरामैय्या यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. श्रीरामुलू हे येडियुरप्पा याचे निकटवर्तीय मानले जातात. श्रीरामुलू यांचे पारडेदेखील जड असल्यामुळे या निवडणुकीत सिद्धरामैय्या यांची नक्कीच कसोटी लागणार आहे. त्यामुळे बागलकोटसह संपूर्ण कर्नाटकातील जनतेचे लक्ष या मतदार संघाच्या लढतीकडे लागले आहे.
 
२००८ साली कर्नाटकात झालेल्या निवडणुकांदरम्यान बागलकोट जिल्ह्यातील सातही मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व होते. वर्चस्व कायम ठेवण्याची संधी असतानाच भाजपमधील अंतर्गत वादामुळे फुट पडली आणि हे वातावरण काँग्रेससाठी पोषक ठरले. २०१३ साली भाजपमधील अंतर्गत वादाचा फटका पट्टणशेट्टी यांना बसला आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच ‘निजद’ने दिलेल्या उमेदवारामुळेही बर्‍याच प्रमाणात मतविभागणी झाली होती.
बदामीमध्ये या निवडणुकांदरम्यानही दोन्ही पक्षांना बंडखोरीला सामोरे जावे लागले आहे. सिद्धरामैय्या हे बदामीमधून रिंगणात उतरल्यामुळे उत्तर कर्नाटकातून काँग्रेसला जास्त जागा मिळण्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात रंगली आहे. बदामी हे पर्यटनस्थळ आहेच. परंतु, विणकर उद्योगांकडे होणारे दुर्लक्ष, मूलभूत सुविधांचा अभाव अशा समस्या समोर असताना निवडणुकीचे बिगुल वाजले. त्यामुळे अशातच मुख्यमंत्र्यांनी बदामीतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे त्यांना या ठिकाणाहून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यातच ‘निजद’तर्फे हणमंत माविनमरद यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांचाही चांगला प्रभाव या क्षेत्रावर मानला जातो. यातच एक महत्त्वाची गोष्ट अशी की, सिद्धरामैय्या यांनी बागलकोटमधल्या बदामी आणि म्हैसूर जवळच्या चामुंडेश्वरी या दोन मतदार संघांमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धरामैय्या यांच्यासाठी चामुंडेश्वरीपेक्षा बदामी हा मतदार संघ अधिक सुरक्षित मानला जातो. ‘कुरूबा’ म्हणजेच धनगर समाजाचे मतदार याठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत, तर या मतदार संघात दलित आणि मुस्लीम समाजाची मतेही निर्णायक ठरणारी आहेत. याचीच दखल घेत सिद्धरामैय्या यांनी बदामीतूनही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, सिद्धरामैय्या यांची लढत दोन्ही मतदार संघात खडतर आहे. त्यांच्या समोर उभे असलेले श्रीरामुलू हेदेखील दलित समाजातील एक लोकप्रिय नेते आहेत. यावेळी निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस, भाजप, निजद असे तीन पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले असले तरी खरी लढत ही काँग्रेसचे सिद्धरामैय्या आणि भापचे श्रीरामुलू यांच्यातच पाहायला मिळेल, हे नक्की.
 
 
बंडखोरीचे बागलकोट
यातच दुसरा महत्त्वाचा मतदार संघ म्हणजे बागलकोट. १९५७ पासून झालेल्या प्रत्येक निवडणुकीत या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. अप्पर कृष्णा योजनेच्या विस्थापितांच्याही अनेक समस्या आजही प्रलंबित आहेत. त्यातच या क्षेत्रात होणारी गटबाजी, बंडखोरी हे चर्चेचे विषय ठरले आहेत. यावेळी काँग्रेसने विद्यमान आमदार एच. वाय. मेटी, तर भाजपने वीरण्णा चिरंतीमठ यांना उमेदवारी दिली आहे. या मतदार संघात सध्या २ लाख २५ हजार ९०९ मतदार आहेत. विस्थापितांच्या समस्यांकडे दुर्लक्ष, तसेच निजद आणि अन्य पक्षांच्या उमेदवारांचा फटका कोणाला बसेल, हे येता काळच ठरवेल. दरम्यान, १९९८ साली झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या पुजार यांचा विजय झाला होता. मात्र, २००४ मध्ये त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी केली. त्यावेळी भाजपच्या वीराण्णा चिरंतीमठ यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांचा विजय झाला होता. त्यानंतर २००८ सालच्या निवडणुकीत देखील चिरंतीमठ विजयी ठरले, तर २०१३ साली भाजपतील गटबाजीमुळे फुट पडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यात गेला. याचवेळी मेटी यांना अबकारी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र, एका प्रकरणात गुंतल्याने त्यांना मंत्रिपद सोडावे लागले. यावेळी पार पडणार्‍या निवडणुकांमध्ये पुजार, प्रकाश तपशेट्टी, अजयकुमार सरनाईक यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, यावेळीही विद्यमान आमदार मेटी यांनाच उमेदवारी देण्यात आली. मेटी यांच्यासमोर भाजपच्या चिरंतीमठ याचे तगडे आव्हान असणार आहेच. तसेच बसप आणि निजद यांची मैत्री, अपक्षांचे आव्हान यामुळे बागलकोटमधील निवडणूक रंगतदार होणार आहे. मात्र, एकंदरीत परिस्थिती पाहता, भाजपच्या चिरंतीमठ यांचे पारडे नक्कीच जड आहे.
 
 
 
जयदीप दाभोळकर 
@@AUTHORINFO_V1@@