रोहिंग्यांच्या प्रश्नासाठी तब्बल ५७ मुस्लीम देश एकत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2018
Total Views |

ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनची ढाकामध्ये होणार बैठक



ढाका : भारत आणि बांगलादेशमध्ये अवैध्यरित्या वास्तव्य करून असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या प्रश्नांवर तोगडा काढण्यासाठी तब्बल ५७ मुस्लीम देश आज ढाका येथे एकत्र येत आहे. मुस्लीम देशांचे नेतृत्व करणाऱ्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन या संघटनेच्या दोन दिवसीय परिषदेला आजपासून ढाका येथे सुरुवात झाली असून 'अल्प संख्यांक रोहिंग्या मुस्लीम' हा या परिषदेच्या चर्चेचा मुख्य विषय असणार आहे.

बांगलादेश, अफगानिस्तान, पाकिस्तानसह संपूर्ण जगातील एकूण ५७ मुस्लीम देशांचे परराष्ट्र मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 'एकता, शांतात आणि विकासामध्ये इस्लामिक तत्वांची भूमिका' अशी या परिषदे संकल्पना असणार आहे. या अंतर्गत म्यानमारमधून विस्थापित झालेले 'रोहिंग्या मुस्लीम आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार' यावर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. रोहिंग्यासाठी म्यानमार सरकारकडून काय प्रयत्न केले जात आहे ? तसेच त्यांच्यासाठी ओआयसीकडून काय प्रयत्न केले जाऊ शकतात ? या मुद्द्यांवर बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.






गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यामध्ये म्यानमारच्या रखायन प्रांतात रोहिंग्या मुस्लीम आणि म्यानमार सैनिकांमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे जवळपास दीड रोहिंग्या मुस्लिमांना म्यानमारमधून पलायन करावे लागले होते. तसेच अनेकांना यामध्ये आपले प्राण देखील गमवावे लागले होते. यावर संयुक्त राष्ट्रांसह जगभरातील मुस्लीम देशानानी आक्षेप घेत म्यानमारवर टीका करण्यास सुरुवात केली होती. परंतु म्यानमारच्या राज्य सल्लागार आंग सान स्यू की यांनी रोहिंग्या मुस्लीम हे दहशतवादी कृत्यांमध्ये सामील असल्याचे सांगत देशाच्या अखंडतेबरोबर कसलीही तडजोड केली जाणार नाही, असे जगजाहीर केले होते. परंतु नंतर चर्चेअंती त्यांनी रोहिंग्यांच्या पुनर्वसना प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर मुस्लीम देश मात्र अद्याप रोहिंग्यांच्या बाजूने उभे असून त्यांच्यासाठी म्हणून ही दोन दिवसीय परिषद घेण्यात येत आहे. 
@@AUTHORINFO_V1@@