‘न्यूड’ चित्रपटाचे नागडे समीक्षक...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
‘‘कलेतली नग्नता सूचक असते. शारीरिक आकारापेक्षा त्यातला निराकारच तिथे कलावंताला दर्शवायचा असतो. हे ज्यांना कळतं ते त्या कलेचा निर्मळ आस्वाद घेतात आणि ज्यांना कळत नाही, ते त्यातली नग्नता शोधून त्या कलाकृतीची मोडतोड करतात. कलावंताला मारहाण करतात. क्वचित कधी त्या कलावंताला आपला देश, आपली माती सोडून जायला भाग पाडतात. खरोखर भारतीय समाजाइतका दांभिक समाज जगाच्या पाठीवर दुसरा नसेल. एकीकडे यांच्या पुराणात नग्नतेसंदर्भातील सगळ्या मर्यादा मोकळेपणाने उल्लंघलेल्या दिसतात आणि त्याच वेळी त्या पुराणांचे गोडवे गाणारी मंडळी नग्नतेवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यामागील कलात्मकतेचा कुठलाही संदर्भ लक्षात न घेता. हे सगळं उगाळण्याचं कारण म्हणजे ‘न्यूड’ हा मराठी चित्रपट. हा चित्रपट म्हणजे आजच्या दांभिक संस्कृतिरक्षकांना दिलेली सणसणीत चपराक आहे...
 
...चित्रकलेचं शिक्षण घेताना नग्न देहाचं रेखाटन हा एक विषयच असतो आणि त्याचं शिक्षण समोर एक नग्न मानवी देह बसवूनच दिलं जातं. तो देह पुरुषाचा असेल किंवा स्त्रीचा... तो रेखाटताना विद्यार्थ्यांची कसोटी असते खरी, मनावर ताबा ठेवण्याची. ज्यांना ते जमतं ते या सिनेमात दाखवलेल्या जयरामप्रमाणे (ओम भुतकर) मोठे चित्रकार होतात. कारण त्यांना नग्न रूपाचं शिक्षण घेताना त्या देहाच्याही पलीकडे असलेलं त्या मॉडेलचं मन आकळलेलं असतं.’’ हे मत माझं नाही. सध्या चित्रपटगृहात लागलेल्या ‘न्यूड’ चित्रपटाच्या, प्रसिद्ध झालेल्या बहुतेक समीक्षणातील सार आहे. समीक्षणातून एक लक्षात येतं की, एक चित्रकार आहे आणि तो एका स्त्रीला समोर विवस्त्र बसवून तिचं चित्र काढतो. यातील फक्त कलात्मकताच सर्वसामान्य प्रेक्षकांनी समजून घेतली पाहिजे, असा या समीक्षकांचा आणि कदाचित दिग्दर्शकाचा आग्रह आहे. याचा आपण क्रमश: समाचार घेऊ या.
समीक्षक म्हणतात की, चित्रकलेचं शिक्षण घेताना नग्न देहाचं रेखाटन हा विषय असतो आणि त्याचं शिक्षण समोर एक नग्न मानवी देह बसवूनच दिलं जातं. तो देह पुरुषाचा असेल किंवा स्त्रीचा... एकदम मान्य. या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांना तो देह स्त्रीचाच ठेवावा, पुरुषाचा नाही, असे का वाटले? यात कलात्मकता होती की पैशाचा हिशेब होता? शारीरिक आकारातील निराकारता दर्शविण्यासाठी पुरुषाचा देह लायक नाही का? या नग्न चित्रणामुळे काहींना देश सोडून पळावे लागले, असे हे समीक्षक म्हणतात.
 
उघड बोला ना की, एम. एफ. हुसेन यांना भारतीयांनी अक्षरश: हाकलून लावले. याचा आम्हा सर्वांना अभिमानच आहे. नग्न चित्रण करण्यासाठी हुसेन यांना देवी सरस्वतीच सापडली का? दुसर्‍या नव्हत्या का? त्यांच्याच ‘सहिष्णू आणि मानवीय’ धर्मातील एकही स्त्री सापडली नाही का? एवढे दूर कशाला जायचे, घरचीच एखादी स्त्री समोर नग्न बसवायची आणि त्यात निराकार का काय म्हणतात तो शोधायचा होता! चित्रकला महाविद्यालयात, नग्न मानवी देहाचे चित्रण, हा विषय असतो म्हणतात. असा विषय असेल तर, प्रत्येक चित्रकला महाविद्यालयात, नग्न मानवी देहाचे चित्रण (अर्थात्‌ अभ्यासक्रम म्हणून हं...) विद्यार्थी करीत असतीलच. किती विद्यार्थ्यांनी मॉडेल म्हणून पुरुषाचा देह निवडला? आता काही विद्यार्थिनीदेखील असतील. त्यांनी मॉडेल म्हणून पुरुष देह निवडला की, समिंलगी स्त्रीचा देह? भारतातील सर्वसामान्य श्रद्धाळू लोकांना ‘दांभिक संस्कृतिरक्षक’ म्हणून झोडपणार्‍या हलकट दांभिक कलासमीक्षकांनीच याचे उत्तर दिले पाहिजे. दुसरे म्हणजे, देह हा देहच असतो. मग तो कुणाचाही असो. मग या चित्रपटातील नायक, मॉडेल म्हणून घरची आई, बहीण किंवा लग्न झालेले असल्यास बायकोला का नाही बसवत? समीक्षक म्हणतात त्याप्रमाणे कलेतील नग्नता सुचविणे आणि शारीरिक आकारातील निराकार अनुभवणे, या दोन्ही गोष्टींसाठी परस्त्रीच कशाला हवी? घरचीच घ्यावी ना! पण नाही... तिथे भावना गुंतलेल्या असतात. आपल्याच घरच्या स्त्रीचे नग्न चित्रण करून परीक्षेत गुण मिळवायला, ‘स्थितप्रज्ञा’चेच मन लागते ना राव! ते प्रत्येक चित्रकारात असेलच असे नाही. पण प्रेक्षकांमध्ये मात्र ही कलेतील सूचक नग्नता, जी अत्यंत बटबटीतपणे चित्रपटात दाखविलेली असते, समजून घेण्याचे ‘स्थितप्रज्ञी’ मन असायलाच हवे, असा यांचा आग्रह असतो. ते तसे नसेल तर, मग तुमच्या पुराणांना झोडपायला हे तयारच असतात.
 
बाबरी ढांचा पडल्यानंतर, मराठी विचारवंतांनी हिंदू धर्माला झोडपण्यासाठी असे मत मांडले होते की, काय आहे त्या वास्तूत? दगडा-मातीचीच रचना आहे ना ती! मग त्यासाठी कशाला भांडायचे? रक्त सांडवायचे? एका विशिष्ट पद्धतीची रचना असली काय नि दुसर्‍या पद्धतीची रचना असली काय! असे मत मांडणारा एक लेख नागपूरच्या नास्तिक मंडळींच्या नियतकालिकात आला होता. त्याला मी उत्तर देताना म्हटले होते की, तुमची आई आणि पत्नीच्या शारीरिक बांधणीत तसे पाहिले तर काहीही फरक नाही. शारीरिक अवयव तर एकच आहेत ना! मग आईला व पत्नीला बघितल्यावर तुमच्याच मनात एकाच प्रकारच्या भावना निर्माण होतात का? तुमचा त्यांच्याशी ‘व्यवहार’ एकाच प्रकारचा असतो का? याचे उत्तर निश्चितच नाही येणार. कारण नुसता देह नाही, तर त्याच्याशी जुळलेल्या भावना महत्त्वाच्या असतात. आई दिसली की वेगळ्या भावना आणि पत्नी दिसली की वेगळ्या भावना निर्माण होतात. तसेच आम्हा हिंदूंचे आहे. अयोध्येतील ती इमारत सामान्य दगडमातीचीच असली, तरी तिथे आमच्या भावना रुजलेल्या आहेत. तिथली माती आणि शंभर फूट दूरची माती गुणधर्माने एकच असली, तरी रामजन्मभूमीची माती आम्ही श्रद्धेने कपाळावर लावतो. या श्रद्धेचा, या भावनेचा सन्मान झाला पाहिजे. माझ्या या उत्तराने तिळपापड उडालेल्या बुद्धिवंतांनी मला त्यांच्या ठेवणीतल्या ‘उपाध्यां’नी न्हाऊन काढले होते. असो. मुद्या हा आहे की, अमेरिका-युरोपातील सौंदर्यविचार आमच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न करणार्‍यांनी आता सावध झाले पाहिजे. शिवाय, ज्या समाजासमोर आम्हाला या नग्नतेतील निराकारत्व दाखवायचे आहे, त्या समाजाची तेवढी पचनक्षमता आहे का, याचाही विचार व्हायला हवा. जे प्रियकर आहे, ते श्रेयस्कर असतेच असे नाही. पुरणाची पोळी कितीही आवडत असली, तरी आजारातून नुकत्याच उठलेल्या व्यक्तीला ती देणं हितावह नसते. मग ती व्यक्ती आपली कितीही प्रिय असली तरी. कारण त्या व्यक्तीची त्या घडीला तशी क्षमता नसते. परंतु, कथित कलावाल्यांना कसेही करून भारताची संस्कृती, मूल्यव्यवस्था उद्ध्वस्त करायची आहे. या (भुक्कड) कलात्मक चित्रपटनिर्मात्यांचे आणखी एक गणित असते. अत्यंत स्वस्त दरातील नट-नट्या वापरायच्या आणि कलात्मकता, वास्तवाचे दर्शन, आदिम भावनांचे प्रकटीकरण इत्यादी शब्द वापरून, त्या चित्रपटात ‘सी’ ग्रेड चित्रपटांसारखी लैंगिक दृश्ये सविस्तर दाखवायची. म्हणजे चित्रपटाचे नाव ठेवायचे ‘आक्रोश’; पण तिच्यात नायिकेवरील बलात्कार इतका सविस्तर दाखवायचा की, प्रेक्षकांनी तो बलात्कार बघण्यासाठीच गर्दी करावी! कुठे सार्वजनिक नळावरील नायिकेची सविस्तर आंघोळ दाखवायची. यात म्हणे प्रेक्षकांनी कला शोधायची! काय बावळटपणा आहे.
 
खरे म्हणजे, रवी जाधव यांना, नग्नतेतील सूचक कलात्मकतेची ढाल घेऊन, सर्वसामान्य प्रेक्षकांच्या लैंगिक भावना चाळवून, या चित्रपटाला गर्दी खेचायची आहे. त्यातून पैसा कमवायचा आहे. असा कुणी आरोप केला तर तो खोटा म्हणता येईल का? आंबटशौकीन समीक्षक तर असल्या चित्रपटांना पुरस्कार देण्यासाठी खूपच ऊठ-ऊठ करीत असतात. काही प्रेक्षकदेखील, आम्हाला हे काही मान्य नाही; परंतु चित्रपटावर टीका करण्यासाठी त्यात नेमके काय दाखविले आहे, ते बघण्यासाठी आम्ही चित्रपट पाहायला जातो, असा शहाजोगपणा करीत असतात. या असल्या भुक्कड निर्माते आणि दिग्दर्शकांना तर असेच प्रेक्षक पाहिजे असतात ना! स्वातंत्र्य मिळवून 70 वर्षे झालीत. आतापर्यंत या असल्या भंकस कलाकारांचे खूप सहन केले. आताही आपण हा कचरा, कला म्हणून सहन करत असू तर, आपल्याला इतिहास आणि भावी पिढ्या क्षमा करतील का, याचा विचार आपण केला पाहिजे.
@@AUTHORINFO_V1@@