भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात कलम ३३ (१) (अ) लागू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-May-2018
Total Views |
 
 
 
 
मतमोजणी क्षेत्रात सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत कलम ३३ (१ ) (अ) लागू 
 
 
भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ पोटनिवडणूक २०१८ ची ईव्हिएम स्ट्राँगरुम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन भंडारा येथे असून ३१  मे २०१८  रोजी म्हणजेच आज या ठिकाणी मतमोजणीची  प्रक्रिया पार पडत आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक पर्यंत रस्त्यावरुन येणारे जाणारे वाहनांची आवागमन मोठया प्रमाणात होत असल्याने मतमोजणी बंदोबस्त दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून मतमोजणी प्रक्रिया दरम्यान शांतता व सुव्यवस्था कायम ठेवणे आवश्यक आहे. 
 
 
यासाठी पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये कलम ३३  (१ ) (अ) ३१  मे २०१८ चे सकाळी ६.०० वाजतापासून ते रात्री ११.००  वाजतापर्यंत लागू केली आहे. कलम ३३ (१ ) (अ) जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौकपर्यंत व त्यास मिळणारे इतर रस्त्यावरुन हो असलेली सर्व प्रकारची वाहतूक तात्पुरती बंद करण्याकरीता अंमलात आहे. 
 
 
 
पालघर आणि भंडारा-गोंदिया या लोकसभा पोटनिवडणूक झालेल्या मतदारसंघांमध्ये सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठपासून या मतमोजणीला सुरुवात झाली असून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. इव्हिएम मशीनच्या मुद्द्याने गाजलेल्या या निवडणुकीत इव्हिएम मशीन तांत्रिक बिघाड हा मुद्दा फारच गाजला आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@