जिल्ह्याचा इयत्ता बारावीचा ८९.७१ टक्के निकाल जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-May-2018
Total Views |
 
 
 
सिं.राजा तालुक्याचा सर्वात जास्त 93.33 टक्के निकाल
 
मुलांच्या निकालाची टक्केवारी 87.08, तर मुलींची 93.03 टक्के
 
परीक्षेला बसलेल्या 32 हजार 9 विद्यार्थ्यांपैकी 28716 विद्यार्थी उत्तीर्ण 

 
 
बुलडाणा :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी घेतलेल्या इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल ऑनलाईन निकाल आज 30 मे 2018 रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत बुलडाणा जिल्ह्याने भरारी घेतली असून जिल्ह्याचा एकूण निकाल 89.71 टक्के नोंदविण्यात आला आहे. निकालाच्या टक्केवारीमध्ये बुलडाणा जिल्हा अमरावती विभागामध्ये वाशिम जिल्ह्यानंतर दुसऱ्या स्थानी आला आहे. 
 
 
जिल्ह्यात इयत्ता 12 वीची 17 हजार 834 विद्यार्थी, तर 14 हजार 175 विद्यार्थीनी अशाप्रकारे एकूण 32 हजार 9 परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 15 हजार 529 विद्यार्थी, तर 13 हजार 187 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्णतेमध्ये एकूण 28 हजार 716 परीक्षार्थी आहेत. यामध्ये मुलांची टक्केवारी 87.08 व मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 93.03 आहे. बुलडाणा जिल्ह्यात सर्वात जास्त 93.33 टक्के निकाल सिं.राजा तालुक्याचा लागला असून त्यापाठोपाठ बुलडाणा तालुक्याचा 92.43 टक्के निकाल आहे. त्याचप्रमाणे दे.राजा तालुका 92.41, चिखली 90.99, मोताळा 90.24, जळगांव जामोद 90.08, मेहकर 90.07, लोणार 89.39, नांदुरा 87.46, खामगांव व मलकापूर 87.41, संग्रामपूर 86.41 आणि शेगांव तालुक्याचा 85.61 टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेमध्ये परीक्षेसाठी 13 हजार 381 परीक्षार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर कला शाखेत 13 हजार 721, वाणिज्य शाखेत 3594 व व्होकेशनल शाखेत 1331 परीक्षार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी विज्ञान शाखेत 12 हजार 949 विद्यार्थी उत्तीर्ण झ्णले असून विज्ञान शाखेचा निकाल 96.79 टक्के लागला आहे. कला शाखेतील 11 हजार 467 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व निकाल 83.64 टक्के आहे. तसेच वाणिज्य शाखेत 3258 विद्यार्थी उत्तीर्ण असून निकाल 90.68 आणि व्होकेशनलमध्ये 1042 विद्यार्थी उत्तीर्ण व निकाल 78.52 टक्के आहे. 
 
 
त्याचप्रमाणे विषयनिहाय बघीतल्यास इंग्रजी विषयाचा निकाल 86.44 टक्के आहे. तर मराठी 97.03, गणित 97.09, इतिहास 96, राज्यशास्त्र 95, भौतिकशास्त्र 98.95, रसायनशास्त्र 98 व जीवशास्त्र विषयात 99.19 टक्के निकाल लागला आहे. तसेच 100 टक्के निकाल विज्ञान शाखेत 50 महाविद्यालयांचा लागला आहे. तर कला शाखेतील 4 व वाणिज्य शाखेतील 11 महाविद्यालयांनी शंभरी निकालाची टक्केवारी गाठली आहे.  मुलांच्या निकालाची टक्केवारी जिल्ह्यात 87.08 असून मुलींच्या निकालाची 93.03 टक्के आहे. अशाप्रकारे जिल्ह्याचा एकूण निकाल 89.71 टक्के लागला आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@