अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाबाहेर दहशतवादी हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2018
Total Views |

भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार देखील मंत्रालयात उपस्थित



काबुल : दहशतवादी हल्ल्यांनी त्रस्त असलेल्या अफगाणिस्तानमध्ये आज आणखी एक दहशतवादी हल्ला झाला आहे. राज्याच्या गृह मंत्रालयाबाहेर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असून विशेष म्हणजे भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रवींद्र खन्ना हे देखील यावेळी मंत्रालयात उपस्थित असून मंत्रालयाबाहेर दहशतवादी आणि अफगाण सुरक्षा रक्षकांमध्ये सध्या जोरदार चकमक सुरु आहे. दरम्यान खन्ना आणि इतर सदस्य हे मंत्रालयात सुरक्षित असल्याची माहिती अफगाणिस्तानच्या सुरक्षा सल्लागार समितीचे प्रवक्ते कादिर शाह यांनी दिली आहे.
अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हानिफ अतमार यांची भेट घेण्यासाठी म्हणून खन्ना हे कालपासून अफगाणिस्तानच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे आज दुपारी त्यांची आणि अफगाण राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या सदस्यांची बैठक सुरु झाली. ही बैठक काबुलमधील गृह मंत्रालयामध्ये आयोजित करण्यात आली होती. दरम्यान सदस्यांची बैठक सुरु झाल्यानंतर थोड्याच वेळात काही अज्ञात हल्लेखोरांनी मंत्रालयाच्या गेट जवळ असलेल्या चेकपोस्टजवळ दोन स्फोट घडवून आणले व यानंतर अचानक काही दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांना लक्ष करत गोळीबार करण्यास सुरुवात केली. परंतु सावध असलेल्या सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांच्या या हल्ल्या प्रतिकार करत उलट गोळीबार सुरु केला. यानंतर सुरक्षा रक्षकांच्या आणखी काही तुकड्या मंत्रालायाकडे रवाना करण्यात आल्या आहेत.
@@AUTHORINFO_V1@@