....आणि केंब्रीज अ‍ॅनालिटिका पडली बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2018
Total Views |

 
फेसबुक डेटा लिक प्रकरणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या केंब्रीज अ‍ॅनालिटिका या कंपनीने आपला गाशा गुंडाळला आहे. केंब्रीज अ‍ॅनालिटिकाने आपली सर्व कामकाज बंद केल्याची घोषणा केली आहे. फेसबुक डेटा लिक प्रकरणानंतर कंपनीचे दिवाळे निघाल्याचे मान्य केले आहे.
 
 
गेल्या काही महिन्यांपासून केंब्रीज अ‍ॅनालिटिकावर निवडणुका प्रभावित करण्याचे आरोप लागले होते. कंपनीने जो डेटा मिळवला होता तो देखील कायदेशीररित्या गैरमार्गाने मिळविलेला असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर यामुळे अनेक देशांतील निवडणुका प्रभावित झाल्याचे देखील समोर आले होते. असे स्वत: केंब्रीज अ‍ॅनालिटिकाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
 
 
याबाबत क्वीन्स कौन्सिल जुलिअन मॅलींस तर्फे स्वतंत्र अभ्यास करण्यात आला आहे. केंब्रीज अ‍ॅनालिटिकाचे राजकीय धागेदोरे शोधण्याचे काम ही संस्था करत आहे. त्याचा अहवाल देखील केंब्रीज अ‍ॅनालिटिकाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार केंब्रीज अ‍ॅनालिटिकावर केलेले आरोप हे पुराव्यासह अद्यापही सिद्ध होऊ शकलेले नाहीत.
 
 
मात्र हे खरे जरी असले तरी देखील स्वत: कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली आहे, आणि आपले सर्व कामकाज बंद केलेले आहेत. त्याचबरोबर केंब्रीज अ‍ॅनालिटिकाची पालक कंपनी एससीएल इलेक्शन लिमिटेड देखील बंद पडल्याचे जाहीर झाले आहे.
 
वाचा मूळ प्रसिद्धीपत्रक 
 
 
@@AUTHORINFO_V1@@