बल्लारपूर -चंद्रपूर भारतातील सर्वात सुंदर रेल्वे स्टेशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2018
Total Views |
 
 

 
 
 
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांवर पुरस्काराची मोहोर


चंद्रपूर : चंद्रपूर रेल्वे स्टेशनवरुन जाणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांना बल्लारपूर आणि चंद्रपूर रेल्वे स्टेशन कायम स्मरणात राहील अशा पद्धतीची सजावट याठिकाणी करण्यात येईल अशी घोषणा करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे राज्याचे अर्थ तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सौंदर्य अभिलाषेवर रेल्वे मंत्रालयाची पुरस्काराची मोहोर उमटली आहे. भारतातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानकाची जोडी म्हणून चंद्रपूर - बल्लारपूरची निवड झाली आहे.
 
 
 
 
 
                                        
      
 
नवी दिल्ली येथे रेल्वे मंत्रालयाने घोषित केलेल्या भारतातल्या सर्वोत्तम रेल्वे स्टेशनमध्ये चंद्रपूर आणि बल्लारपूरच्या प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. चंद्रपूरसाठी ही बातमी आनंदाची असून प्रयत्नपूर्वक केलेल्या प्रयत्नांना आलेले यशाची कहाणी सुद्धा आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील या स्थानकाच्या सौंदर्य करणाचा निर्णय झाला. वर्षभरापूर्वी याठिकाणी नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयामार्फत आदिवासींमध्ये असणाऱ्या लोककला आणि राष्ट्रीय उद्यान ताडोबातील वन्यजीवाच्या वैभवाला साकारण्यासाठी चित्रकारांचा चमू कार्यरत झाला. आणि बघताबघता चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्टेशनचा कायापालट झाला.
 
 
 
 
 
चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर आलेल्या प्रत्येक प्रवाशाला या ठिकाणी काढण्यात आलेल्या विविध वन्यजीवांचे चित्र आकर्षून घेते. बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर साक्षात ताडोबा मधील पराक्रमी वाघ पायऱ्यांवर साकारला असून हा एक सेल्फी पॉईट झाला आहे. त्यामुळे बल्लारपूर स्टेशन वर केलेला कुठलाही प्रवासी या ठिकाणी वाघाच्या समोर उभा राहिलेला सेल्फी काढल्याशिवाय बाहेर पडत नाही. गेल्या वर्षभरात यासाठी प्रयत्न करणारे सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वेच्या या घोषणेचे स्वागत केलेले आहे. त्यांनी रेल्वेमंत्र्यांचे ही यासाठी आभार मानले. नॅशनल ट्रान्सपोर्ट इनहाऊस स्टेशन ब्युटीफिकेशन स्पर्धेमध्ये चंद्रपूर आणि बल्लारपूर प्रथम आले आहे. आज रेल्वे मंत्रालयातर्फे जारी करण्यात आलेल्या एका पत्रकामध्ये ही घोषणा करण्यात आली आहे. भारतामध्ये या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर बिहारची मधुबनी स्टेशन आहे. याठिकाणी स्थानिक कलाकारांनी चित्र साकारले आहेत.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@