मुंबई, ’ममता प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेतर्फे अंधेरी येथे ‘महिला सक्षमीकरण : आर्थिक व सामाजिक’ या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम समाज सेवा केंद्र, साईबाबा नगर, मरोळ पाईपलाईन येथे नुकतीच पार पडला. उद्योजिका आरती कांबळे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. आरती कांबळे या ’आरती ऍग्रो अॅण्ड फूड्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या संचालिका आहेत. ”महिलांची आर्थिक आणि सामाजिक सुरक्षितता सध्या काळाची गरज बनली आहे. महिलांनी उद्योग क्षेत्रामध्ये आपले पाऊल टाकावे. त्यांनी आर्थिकदृष्टीने सक्षम व्हावे,” असे या कार्यक्रमाच्या वेळी आरती कांबळे यांनी सांगितले.
या कार्यक्रमच्या वेळी सीमा सोनावणे यांनी बेकरी या क्षेत्राबद्दल माहिती दिली. तर; संजना गजाकोश यांनी सौदर्य प्रसाधने आणि सुगंधी द्रव्य याबद्दल माहिती दिली. तसेच जयश्री गजकोश यांना त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले.