वाचन जगण्याची नवी उमेद देईलः भरत दाभोळकर

    27-May-2018
Total Views |



मुंबई : आपण नापास झालो आहोत, ही भावनाच प्रत्येक विद्यार्थ्याला आणि त्याच्या पालकांना मनामधून खच्ची करून टाकते. म्हणून या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी ‘मंथन आर्ट स्कूल’ आणि युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रिएटीव्ह करिअर काऊंन्सलिंग- १८ नावाचे मोफत करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ शनिवार, दि. २६ मे रोजी पु. ल. देशपांडे सभागृह, प्रभादेवी येथे करण्यात आला असून त्याचे उद्घाटन ऍड गुरु भरत दाभोळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. “जाहिरात क्षेत्र हे मागणीवर चालणारे क्षेत्र आहे. जशी मागणी असेल तसे काम आपण केले पाहिजे. वाचन तुम्हाला जगण्याची नवी उमेद देईल आणि तुमच्या कल्पनांना नवीन दिशा मिळेल,“ असा सल्ला यावेळी दाभोळकर यांनी दिला.