पंतप्रधानांनी केले सावरकरांचे स्मरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2018
Total Views |




नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या 'मन कि बात' या कार्यक्रमामध्ये थोर स्वातंत्र्यसेनानी आणि समाजसुधारक विनायक दामोदर सावरकर यांचे आज स्मरण केले. सावरकरांच्या उद्या होणाऱ्या जन्मजयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना अभिवादन करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. 

'स्वा.सावरकर हे अत्यंत महान असे नेते होते. सावरकर हे 'शस्त्र आणि शास्त्र' या दोन्हींचे उपासक होते. त्यामुळे राष्ट्रकार्यासाठी अत्यंत निर्भीडपणे ते आपले मत व्यक्त करत. '१८५७ साली झालेल्या उठवला अनेकांनी एक म्हणून 'बंड' म्हणून घोषित केले होते. परंतु हे बंड नसून देशातील सर्वात प्रथम स्वातंत्र्य युद्ध' अशी थेट भूमिका सावरकरांनी घेतली होती. सावरकर हे ज्या प्रकारे एक स्वातंत्र्यसेनानी होते, त्याच बरोबर ते एक समाजसुधारक आणि साहित्यिक देखील होते. आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी सामाजिक सुधारणांसाठी अत्यंत कठोर परिश्रम घेतले. त्यामुळे त्यांचे व्यक्तीमत्त्व हे बहुआयामी असे होते. सावरकर एकमेव असे नेते होते जे 'कविता आणि क्रांती' या दोन्ही गोष्टींना एकसोबत घेऊन जगले' असे मोदींनी यावेळी म्हटले.

तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची एक आठवण देखील त्यांनी यावेळी सांगितली, सावरकरांच्या स्मरणार्थ अटलजी नेहमी म्हणत कि, 'सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे त्याग, सावरकर म्हणजे तप, सावरकर म्हणजे तत्व, सावरकर म्हणजे तर्क, सावरकर म्हणजे तारुण्य, सावरकर म्हणजे बाण, सावरकर म्हणजे तलवार' अशा या सावरकरांना आपले अभिवादन, असे मोदी यावेळी म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@