अकोलकरांनी अनुभवला 'शून्य सावली दिवस'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2018
Total Views |

जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय देखील झाले सहभागी 



अकोला : सूर्याच्या स्थलांतरामुळे घडणाऱ्या झिरो शॅडो अर्थात शून्य सावली या खगोलीय घटनेचा आज दुपारी अकोलकरांनी अनुभव घेतला. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेयसह शहरामध्ये अनेक ठिकाणी नागरिक आणि शालेय विद्यार्थांनी या शून्य सावली दिनाचा प्रत्यक्ष अनुभव घेत, या खगोलीय घटनेचा आनंद लुटला.

आज दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी अकोल्यामध्ये सूर्य बरोबर नागरिकांच्या डोक्यावर आला होता. त्यामुळे शहरातील नागरिक, शालेय विद्यार्थी आणि खुद्द जिल्हाधिकारी यांनी देखील घटनेचे साक्षी होण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जमा झाले होते. यानंतर सूर्य बरोबर डोक्यावर आल्यानंतर सर्वांची सावली काही काळासाठी गायब झाली होती. सावलीचा हा रोमांचकारी अनुभव घेण्यासाठी जिल्हाधिकारी पाण्डेय यांच्यासह मनपा आयुक्त जितेंद्र वाघ , निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्यासह काही विद्यार्थी आणि शिक्षक देखील उपस्थित होते.

पृथ्वी सुर्याभोवती भ्रमण करतांना पृथ्वी आपल्या कक्षात साडेतेवीस अंश सुर्याकडे झुकते यामुळे सुर्योदय आणि सुर्यास्त प्रत्येक दिवशी स्थान बदलवून होत असतो. यामुळे उत्तरायन व दक्षिनायन होत असते. प्रत्येक वर्षी दोन दिवस सुर्य विषुववृत्तावर असल्यामुळे रात्र व दिवस समान असतात. तसेच वर्षातून दोन वेळा सुर्य बरोबर डोक्यावर आल्यामुळे कोणत्याही वस्तूची सावली ही अगदी बरोबर तिच्या पायाखाली त्यामुळे ती दिसत नाही. यामुळे या दिवसाला जगभरात 'झिरो शॅडो डे' असे म्हटले जाते.
@@AUTHORINFO_V1@@