देशाच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्र्यांची 'रेशीमबागे'ला भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2018
Total Views |


नागपूर : देशाच्या पहिला महिला संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज स्वइच्छेने नागपूर येथील संघ कार्याला भेट दिली आहे. यावेळी संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक मा.स.गोळवलकर यांच्या स्मृतीला त्यांनी अभिवादन केले. यावेळी संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी आणि इतर स्वयंसेवक देखील याठिकाणी उपस्थित होते. विशेष म्हणजे देशाच्या संघाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाज देशाच्या महिला संरक्षण मंत्र्यांनी रेशीमबागेला स्वइच्छा भेट दिल्याची घटना घडली आहे.

आपल्या काही वैयक्तिक कामासाठी म्हणून सीतारामन या नागपूर येथे आल्या होत्या. यावेळी वेळात वेळ काढून त्यांनी रेशीमबाग येथील संघ कार्यालयाला भेट दिली. यावेळी भैय्याजी यांनी सीतारामन यांचे स्वागत केले. यानंतर सीतारामन यांनी अनुक्रमे डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळांना भेट देऊन त्यावर पुष्प अर्पण केले, तसेच अभिवादन केले. यानंतर भैय्याजींशी त्यांनी थोडावेळ चर्चा केली. यावेळी भैय्याजींनी सीतारामन यांना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांचे एक प्रतिमा भेट म्हणून दिली.

@@AUTHORINFO_V1@@