भुसावळात सत्ताधारी- विरोधकांमध्ये तुतु-मैमै

    22-May-2018
Total Views |
 
भुसावळ, २२ मे : 
गेल्या वर्षी देशातील सर्वात अस्वच्छ शहर म्हणुन भुसावळ शहराचा व्दितीय क्रमांक आला होता. पालिका प्रशासनाने शहर स्वच्छतेसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले. आणि नुकत्याच झालेल्या सर्व्हेक्षणात भुसावळ पालिकेलेने फास्टर मुव्हर क्लीननेस सिटीचा अवार्ड पटकावला आहे.
 
 
देशातील ४ हजार २०० हून अधिक शहरांचे सर्व्हेक्षण हैदराबाद येथील कार्वी एजन्सीतर्फे करण्यात आले होते. यात विविध ५२ निकष त्यासाठी लावण्यात आले होते. भुसावळ पालिकेला अवार्ड जाहिर झाला असून दिल्ली येथे या पुरस्कार पालिकेला प्रदान करण्यात येणार आहे. ज्या एजन्सीने हा सर्व्हे केला होता. त्या एजन्सीचे चार प्रतिनिधी भुसावळ शहरात आलेले आहेत. दिल्ली येथे पुरस्कार वितरणा दरम्यान स्वच्छेबाबतची चित्रफित सदर एजन्सीव्दारे दाखविली जाणार आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी त्यांच्या प्रतिनिधींनी दिनदयाळ नगर मधील स्वच्छतेबाबतचे चित्रण करण्यास सुरुवात केली असता जनाधार पार्टीचे नगरसेवक दुर्गेश ठाकुर यांनी त्यांना विरोध करुन केवळ स्वच्छतेचे चित्रकरण करण्यापेक्षा अस्वच्छतेचेसुध्दा चित्रीकरण करा असे सुचविले यावरुन भाजपाचे नगरसेवक महेंद्रसिंग ठाकुर आणि दुर्गेश ठाकुर यांच्यात शाब्दीक चकमक झाली. या प्रसंगी चित्रीकरणकरणार्‍यांचे कॅमेरे ओढण्या पर्यंत वाद पोहचला होता.
 
 
या नंतर चित्रीकरण करणार्‍या टिमने पालिका गाठून मुख्याधिकार्‍यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. दरम्यान विरोधीपक्षनेते उल्हास पगारे यांनी झालेल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली. नगरसेवक पगारे, दुर्गेश ठाकुर व सिकंदर खान हे पालिकेत पोहचे.दरम्यान मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष हे पालिकेच्या बाहेर येत असतांना विरोधीगटाने केवळ स्वच्छतेचेच चित्रिकरण का करतात ? अस्वच्छतेचे सुध्दा चित्रिकरण करा असे संागितले. यावर नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिल्लीयेथे ही चित्रफित दाखविली जाणार असून त्यात केवळ स्वच्छताच दाखविली जाणार आहे. चित्रिकरणकरणारी टिम दिल्लीहून आली असल्याचे स्पष्ट केले.याप्रसंगी विरोधक व सत्ताधार्‍यांची किरकोळ शाब्दीक तुतु-मैंमैं झाली. या नंतर या वादावर पडदा पडला. परंतु या वादामुळे पालिकेचे राजकारण ढवळून निघाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.