शिवसेनेत उभी फूट पडेल ? : रामदास आठवले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2018
Total Views |


 
 
नागपूर : पुढील निवडणूकीत जर भाजप आणि शिवसेनेने युती केली नाही तर शिवसेनेत उभी फूट पडेल असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. नागपुर येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले. माध्यमांनी , "पुढील निवडणूकीत भाजप आणि शिवसेनेत युती होणार का?"असा प्रश्न विचारला असता, त्यांनी हे उत्तर दिले.
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपची युती आहे, येत्या निवडणूकीत देखील ती युती कायम रहावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसे न केल्यास शिवसेनेचे अनेक आमदार पक्ष सोडतील, असे भाकीत देखील त्यांनी यावेळी केले.
या बद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत देखील चर्चा केली, असेही ते यावेळी म्हणाले. त्यामुळे शिवसेनेने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे तसेच भाजपने देखील याचे महत्व समजून घ्यावे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
अॅट्रोसिटी कायद्याला आणखी मजबूत करण्याचे प्रयत्न :

यावेळी त्यांना पत्रकारांनी अॅट्रोसिटी कायद्याविषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, " अॅट्रोसिटी कायद्याला धक्का लावण्याचा केंद्र सरकारचा कुठलाही मानस नाही, उलट केंद्र सरकारच्या निर्णयामुळे अॅट्रोसिटी कायदा अधिक सक्षम होईल." "अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना नोकरीच्या पदोन्नतीमध्ये आरक्षण कायम रहावं यासाठीही केंद्र सरकार कायद्यात बदल करु शकतं" असंही ते यावेळी म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@