वेतन ऑफलाईनहोण्याचा मार्ग मोकळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2018
Total Views |
 
 
 
वेतन ऑफलाईन
होण्याचा मार्ग मोकळा
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गात आनंद
 
शिंदखेडा,१९ मे
नाशिक विभागातील २०६ कर्मचार्‍यांचे वेतन ऑफलाईन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गात आनंद व्यक्त होत आहे. तसेच तसेच या निर्णयानुसार थकीत व जुलै २०१८ पर्यंतचे नेहमीत वेतन ऑफलाईन पद्धतीने अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. अनिकेत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याची प्रतिक्रिया शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.
नाशिक विभागातील माध्यमिक शिक्षकांना सक्षम अधिकार्‍यांनी वैयक्तिक मान्यता देऊन सुमारे २ ते ३ वर्ष झाले असून देखील या शिक्षकांना शालार्थ आयडी मिळालेला नसल्याने ते वेतनापासून वंचित आहेत, असे निवेदन अनिकेत विजय पाटील यांनी शिक्षण मंत्री ना. विनोद तावडे यांना नुकतेच दिले होते. शालार्थ वेबसाईट बंद असल्याने मान्यता प्राप्त शिक्षक यांना ऑफलाईन शालार्थ आयडी देऊन वेतन त्वरित देणे, याबाबत आदेश देऊन शालार्थ प्रणाली वेबसाईट सुरु झाल्यानंतर यांच्या शालार्थ आयडी प्रक्रियामध्ये नावे समाविष्ट करावी, अशी मागणीही त्यात होती. आणि त्याबाबत पाठपुरावा सुरु होता. अखेर त्यात यश आले असून शासने शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे थकीत व नेहमीचे वेतन ऑफलाईन अदा करण्याबाबत शासनाने १८ मे रोजी आदेश निर्गमित केल्याचे पत्र अनिकेत पाटील यांना पाठविले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@